मुख्य सामग्रीवर वगळा

जीवन शिक्षण

दिनांक -1-12-2024

 सध्याचे भारतीय शिक्षण हे लाचार,गुलाम आणि श्रमहीन आहे. व तसेच बेकारी आणि भिकारी निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था भारतामध्ये रुजू झाली आहे. कसलही प्रात्यक्षिक नाही. चुकीच्या परीक्षा पद्धती. चरित्रहीण यंत्रणा. स्वदेशी तत्त्वांचा खूप अभाव आहे. आणि विदेशी कृतींचा प्रभाव आपल्या शिक्षणावर दिसून येत आहे.नवनवीन शिक्षण पद्धती येत आहे हा ही प्रश्न लवकरच सुटेल  आपण अशा करू.


                               लेखेक सौ.गायत्री अमोल बिरादार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुन्हेगारीला प्रवर्त करणारी शिक्षण पद्धती!

कोयता गॅंग एक भीषण समस्या  कोयता गँग ही एक समाजात भयावह समस्या बनत चालली आहे. त्यामुळे समाजात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होत चालले आहे. राजधानी पासून ते  खेड्यापाड्यापर्यंत कोयता गॅंगने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. अनेक गरीब आणि चांगल्या कुटुंबातील मुले सुद्धा कोयता गँगकडे आकर्षले जात आहेत. ही गोष्ट त्या मुलांच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी चिंतेचा विषय बनत आहे. * विश्वाला अहिंसेची शिकवण देणारा भारत देश *  एकेकाळी संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे गौतम बुद्ध भारत देशात जन्मले. भगवान गौतम बुद्धाने विश्वाला शांततेचा संदेश देऊन जगाच्या पाठीवर भारत देशाची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज लोकं धर्माधर्मात भांडून हिंसेला खतपाणी घालत आहेत भगवान गौतम बुद्धांनी धर्माबरोबरच शांती शिकवली आहे, शांती हाच धर्म आहे.  म्हणून जगाने हृदयापासून भगवान बुद्धाला स्वीकारलं आहे. आजही विश्वभरातून एकच नाद घुमतो की " युद्ध नको बुद्ध हवा "    असे शांततेचे संदेश आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये आज कुठेही दिसत नाहीत पावलोपावली दिसते ती फक्त स्पर्धा आणि स्पर्धा विद्यार्थ्यांना एकमेकांशी...

मकोका म्हणजे काय?

महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राइम ऍक्ट    मकोका म्हणजे काय ?  मकोका कधी लागतो ?   मकोका कारवाई कुणावर होते .  मकोका कारवाई झाल्यानंतर आरोपीला कोणती शिक्षा होते..   कायदा   https://youtube.com/@avirat.biradar2021?si=UHBCkTgiRKJAmA1m * मकोका म्हणजे काय :-  महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ऍक्ट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा म्हणजेच मकोका होय.  राज्य सरकारने संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी मकोका कायदा हा करण्यात आला.  मकोका कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालतो.   * मकोका कधी लागतो :-  गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते . पण या संधीचा गैरफायदा घेऊन तो आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवर येतो . आरोपीवर अटकेची व तडीपारची देखील कारवाई होते . अशा आरोपींना अटक केली जाते तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास आरोपीवर तडीपाराची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपी मध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलिसांना मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आह...

लबाड आणि लुटारू शिक्षण व्यवस्था

सध्या शिक्षण व्यवस्थेमध्ये लबाड , खोटे - नाटे बोलून विद्यार्थी आणि पालक वर्गाला लुटत राहणे हा व्यापारच झाला आहे का ?  शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, पण हे दूध मात्र ज्यांच्याकडे धनाचा साठा भरमसाठ आहे , आणि जो छुप्या मार्गाने शिक्षण यंत्रणेला  देऊ शकतो त्यालाच हे वाघिणीचे दूध दिले जात आहे का ? असा भयानक प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे .  आज समाजामध्ये मुठभर बुद्धिजीवी लोक शिकून सवरून मोठे होत आहेत . परंतु त्यांच्यासाठी आणखीन एक परीक्षा लावली जात आहे . ती परीक्षा म्हणजे धनसंपत्ती परीक्षा !  ज्यांच्याजवळ जेवढा जास्त पैसा त्याची तेवढी जास्त गुणवत्ता ! गुणवत्तेच्या यादीत पहिल्या क्रमांकावर त्याचेच नाव  छुप्या मार्गाने जो पैशाच्या गरम नोटा शिक्षण यंत्रणेला नेवून देईल .  वैद्यकीय , अभियांत्रिकी  महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी  वीस पंचवीस लाखापासून करोडो रुपये मोजावे लागतात . जर विचार केला तर खरंच एका विद्यार्थ्यामागे करोडो रुपये खर्च शिक्षण व्यवस्था करते का ? शिक्षण व्यवस्थेने यावर कधी आत्मपरीक्षण केलं आहे का ? अशी लाखो करोडो रुपये भरण्याइतपत सर्वसाधार...