अर्थहीन असलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यावर लादणे योग्य आहे का ? वर्षानुवर्षे चालत आलेली भारतीय शिक्षण पद्धती बदलून ब्रिटिशांनी ब्रिटिश शिक्षण पद्धती भारतीय विद्यार्थ्यांवर लादली, इंग्रज भारत देश सोडून गेल्यानंतर शिक्षण पद्धतीत सुधारणा व्हायला पाहिजे होती , परंतु आपल्या देशात शैक्षणिक सुधारणा काहीच केल्या गेल्या नाहीत , या उलट शिक्षण पद्धती अधिक गुंतागुंतीची करण्यात आली . वास्तविक पाहता या शाळा महाविद्यालयीन अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना तीळ मात्र ही उपयोग होताना दिसत नाही . पण झिरो वयोगटापासून वयाच्या 35 वयोवर्षाचा काळ हा फालतूकच्या शिक्षणामध्ये बरबाद होत आहे , केवळ वेळच बरबाद होत नाही तर या शिक्षण व्यवस्थेने काढलेल्या चुकीच्या परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांचे आयुष्य हिरावून घेत आहेत. ब्रिटिशी शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची वैचारिक शक्ती आणि सहनशीलता नष्ट झाली आहे. * वर्षभर घेतलेल्या ज्ञानाचा केंद्रबिंदू परीक्षाच का ? * आपल्या शिक्षणामध्ये सरकारने तयार केलेला अभ्यासक्रम शिकवला जातो, आणि त्या अभ्यासक्रमादरम्यान नको त्या प्रमाणात विद्यार्थ्...