मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मकोका म्हणजे काय?

महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राइम ऍक्ट    मकोका म्हणजे काय ?  मकोका कधी लागतो ?   मकोका कारवाई कुणावर होते .  मकोका कारवाई झाल्यानंतर आरोपीला कोणती शिक्षा होते..   कायदा   https://youtube.com/@avirat.biradar2021?si=UHBCkTgiRKJAmA1m * मकोका म्हणजे काय :-  महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ऍक्ट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा म्हणजेच मकोका होय.  राज्य सरकारने संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी मकोका कायदा हा करण्यात आला.  मकोका कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालतो.   * मकोका कधी लागतो :-  गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते . पण या संधीचा गैरफायदा घेऊन तो आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवर येतो . आरोपीवर अटकेची व तडीपारची देखील कारवाई होते . अशा आरोपींना अटक केली जाते तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास आरोपीवर तडीपाराची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपी मध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलिसांना मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आह...
अलीकडील पोस्ट

गुन्हेगारीला प्रवर्त करणारी शिक्षण पद्धती!

कोयता गॅंग एक भीषण समस्या  कोयता गँग ही एक समाजात भयावह समस्या बनत चालली आहे. त्यामुळे समाजात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होत चालले आहे. राजधानी पासून ते  खेड्यापाड्यापर्यंत कोयता गॅंगने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. अनेक गरीब आणि चांगल्या कुटुंबातील मुले सुद्धा कोयता गँगकडे आकर्षले जात आहेत. ही गोष्ट त्या मुलांच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी चिंतेचा विषय बनत आहे. * विश्वाला अहिंसेची शिकवण देणारा भारत देश *  एकेकाळी संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे गौतम बुद्ध भारत देशात जन्मले. भगवान गौतम बुद्धाने विश्वाला शांततेचा संदेश देऊन जगाच्या पाठीवर भारत देशाची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज लोकं धर्माधर्मात भांडून हिंसेला खतपाणी घालत आहेत भगवान गौतम बुद्धांनी धर्माबरोबरच शांती शिकवली आहे, शांती हाच धर्म आहे.  म्हणून जगाने हृदयापासून भगवान बुद्धाला स्वीकारलं आहे. आजही विश्वभरातून एकच नाद घुमतो की " युद्ध नको बुद्ध हवा "    असे शांततेचे संदेश आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये आज कुठेही दिसत नाहीत पावलोपावली दिसते ती फक्त स्पर्धा आणि स्पर्धा विद्यार्थ्यांना एकमेकांशी...

परावलंबी बनवणारे शिक्षण

स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिक्षण घेऊन शेवटी परावलंबी बनवून ठेवते ते शिक्षण काय कामाचे ?  ब्रिटिश शिक्षण पद्धतीतील म्हणजे आजच्या शिक्षण पद्धतीतील सगळ्यात मोठा दोष म्हणजे हे शिक्षण विद्यार्थ्यांना जन्मभर परावलंबी बनवत आहे . सध्याचे शिक्षण ही निव्वळ पुस्तकी ज्ञान आहे . त्यामध्ये कर्तव्याला , मनगटाच्या ताकतीला थोडेही महत्व दिले नाही , वर्गात शिक्षकांनी शिकवलेले फक्त पाठ करणे आणि 365 दिवस कागदी घोडे नाचवत राहणे याव्यतिरिक्त आजच्या शिक्षणात इतर काहीच नाही . संगीत , गायन - वादन , वकृत्व - नेतृत्व , कर्तृत्व - दातृत्व  विकसित करणारे शिक्षण   तर कधी स्वप्नातही दिसत नाही. फक्त कागदी घोडे नाचवत राहणे विद्यार्थ्यांच्या हातातील, अंगातील कला विकसित होऊन स्वावलंबी जीवन जगेल अशी शिक्षण पद्धती आज कोठेच दिसत नाही.   त्यामुळे "आपले कर्तव्य पालन करण्याचे सामर्थ्य आम्हाला लाभत नाही "   ( महात्मा गांधी ) आज उघड्या डोळ्यांनी आपण पाहतो की सकाळी दहा वाजता पासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शाळेत विद्यार्थ्यांना फक्त कागद काळे करायची सवय लावली जाते, सध्या शाळेत महाविद्यालयात जे ...

|| निरर्थक अभ्यासक्रम ||

  अर्थहीन असलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यावर लादणे योग्य आहे का ?  वर्षानुवर्षे चालत आलेली भारतीय शिक्षण पद्धती बदलून ब्रिटिशांनी ब्रिटिश शिक्षण पद्धती भारतीय विद्यार्थ्यांवर लादली, इंग्रज भारत देश सोडून गेल्यानंतर शिक्षण पद्धतीत सुधारणा व्हायला पाहिजे होती , परंतु आपल्या देशात शैक्षणिक सुधारणा काहीच केल्या गेल्या नाहीत , या उलट शिक्षण पद्धती अधिक गुंतागुंतीची करण्यात आली .   वास्तविक पाहता  या शाळा महाविद्यालयीन अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना तीळ मात्र ही उपयोग होताना दिसत नाही . पण झिरो वयोगटापासून वयाच्या 35 वयोवर्षाचा काळ हा फालतूकच्या शिक्षणामध्ये बरबाद होत आहे , केवळ वेळच बरबाद होत नाही तर या शिक्षण व्यवस्थेने काढलेल्या चुकीच्या परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांचे आयुष्य हिरावून घेत आहेत. ब्रिटिशी शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची वैचारिक शक्ती आणि सहनशीलता नष्ट झाली आहे.    * वर्षभर घेतलेल्या ज्ञानाचा केंद्रबिंदू परीक्षाच का ? *  आपल्या शिक्षणामध्ये सरकारने तयार केलेला अभ्यासक्रम शिकवला जातो, आणि त्या अभ्यासक्रमादरम्यान नको त्या प्रमाणात विद्यार्थ्...

लबाड आणि लुटारू शिक्षण व्यवस्था

सध्या शिक्षण व्यवस्थेमध्ये लबाड , खोटे - नाटे बोलून विद्यार्थी आणि पालक वर्गाला लुटत राहणे हा व्यापारच झाला आहे का ?  शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, पण हे दूध मात्र ज्यांच्याकडे धनाचा साठा भरमसाठ आहे , आणि जो छुप्या मार्गाने शिक्षण यंत्रणेला  देऊ शकतो त्यालाच हे वाघिणीचे दूध दिले जात आहे का ? असा भयानक प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे .  आज समाजामध्ये मुठभर बुद्धिजीवी लोक शिकून सवरून मोठे होत आहेत . परंतु त्यांच्यासाठी आणखीन एक परीक्षा लावली जात आहे . ती परीक्षा म्हणजे धनसंपत्ती परीक्षा !  ज्यांच्याजवळ जेवढा जास्त पैसा त्याची तेवढी जास्त गुणवत्ता ! गुणवत्तेच्या यादीत पहिल्या क्रमांकावर त्याचेच नाव  छुप्या मार्गाने जो पैशाच्या गरम नोटा शिक्षण यंत्रणेला नेवून देईल .  वैद्यकीय , अभियांत्रिकी  महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी  वीस पंचवीस लाखापासून करोडो रुपये मोजावे लागतात . जर विचार केला तर खरंच एका विद्यार्थ्यामागे करोडो रुपये खर्च शिक्षण व्यवस्था करते का ? शिक्षण व्यवस्थेने यावर कधी आत्मपरीक्षण केलं आहे का ? अशी लाखो करोडो रुपये भरण्याइतपत सर्वसाधार...

सामाजिक विषमतेची दरी निर्माण करणारे शिक्षण :-

शिक्षण व्यवस्थेद्वारे समाजात सामाजिक विषमतेची दरी का निर्माण केली जात आहे.   आज समाजात शिक्षणामुळे माणूस घडतो असे आपण क्षणाक्षणाला म्हणतो , ते प्रत्येकाला खरे ही वाटते,म्हणून शिक्षण हे आपल्या जीवनाची पोषक तत्व आहे असे मानतो. शिक्षणामुळे माणूस सामाजिक बांधिलकी जोपासतो , शिक्षणामुळे माणसाला समाजाबद्दल प्रेम निर्माण होते असेही आपण ऐकतो , परंतु हल्ली परिस्थिती मात्र वेगळी आहे. सध्याच्या शिक्षण पद्धतीत सामाजिकतेला कुठेच स्थान दिसत नाही . शिक्षण प्रक्रियेतून सामाजिक बांधिलकी पूर्णपणे दुर्लक्षित :- कधीकाळी शिक्षणाची आणि शिक्षकांची आस्था एवढी सुदृढ होती की , विद्यार्थ्यांना उन्नत करून त्यांना स्वावलंबी , प्रामाणिक , इमानदार माणूस बनवण्याची जबाबदारीच गुरुजी , शिक्षकांची होती परंतु आजचे दृश्य विरोधाभास निर्माण करणारे झाले आहे . खऱ्या अर्थाने आजचे दृश्य विपरीत आहे . आज आमचे , शिक्षक आणि प्राध्यापक हे महिन्याचा पगार उचलण्यापुरते मर्यादित झालेले दिसत आहे . आणि विद्यार्थी - विद्यार्थी  तर फक्त पदवीचे ( डिग्री ) प्रमाणपत्र गळ्यात बांधून नोकरीसाठी झुंजत राहण्यापुरतेच मर्यादित झाले आहे.  ...

आरोग्य बिघडणारे शिक्षण

तुम्हाला माझी आणखीन ब्लॉक व्हायचे असतील तर या लिंक वर क्लिक करा.  https://draft.blogger.com/u/1/blog/post/edit/1317193413583215689/9003872123497158672   सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये शारीरिक स्वास्थ्याचा आणि शिक्षणाचा कुठेही संबंध दिसत नाही.  डॉक्टर्स   सध्याच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मानवी आरोग्याला महत्व दिले जात नाही मोठ मोठाले प्राध्यापक,वकील, डॉक्टर, इंजिनीअर्स, अधिकारी व तसेच उद्योगपती यांना भरमसाठ पैसा कमावण्याचे ज्ञान आहे परंतु आरोग्याचे कसलेही ज्ञान नाही. असे अनेक डॉक्टर आहेत की ज्या रोगाचे तज्ञ आहेत त्याच रोगांनी ते स्वतःच ग्रस्त आहेत उदाहरणार्थ एखादा डॉक्टर नेत्र विकार तज्ञ असतो पण त्यांना स्वतः चष्मा लावल्याशिवाय दिसत नाही, अनेक शुगर स्पेशलिस्टांना शुगरची गोळी घेतल्याशिवाय  भागत नाही, अनेक मूळव्याध तज्ञ दैनंदिन जीवनात मुळव्याधीने त्रस्त आहेत. हा विषय विचार करण्यासारखा आहे याचे कारण त्या डॉक्टरांना आजारांवर उपचार करण्याचे शिक्षण मिळाले परंतु आजारी न पडण्याचे शिक्षण त्यांना मिळालेच नाही. डॉक्टर लोकांच्या जीवनामध्ये या समस्या जर असतील तर इतर लोकांचा ...