मुख्य सामग्रीवर वगळा

|| निरर्थक अभ्यासक्रम ||

 अर्थहीन असलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यावर लादणे योग्य आहे का ?

 वर्षानुवर्षे चालत आलेली भारतीय शिक्षण पद्धती बदलून ब्रिटिशांनी ब्रिटिश शिक्षण पद्धती भारतीय विद्यार्थ्यांवर लादली, इंग्रज भारत देश सोडून गेल्यानंतर शिक्षण पद्धतीत सुधारणा व्हायला पाहिजे होती , परंतु आपल्या देशात शैक्षणिक सुधारणा काहीच केल्या गेल्या नाहीत , या उलट शिक्षण पद्धती अधिक गुंतागुंतीची करण्यात आली . 
 वास्तविक पाहता  या शाळा महाविद्यालयीन अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना तीळ मात्र ही उपयोग होताना दिसत नाही . पण झिरो वयोगटापासून वयाच्या 35 वयोवर्षाचा काळ हा फालतूकच्या शिक्षणामध्ये बरबाद होत आहे , केवळ वेळच बरबाद होत नाही तर या शिक्षण व्यवस्थेने काढलेल्या चुकीच्या परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांचे आयुष्य हिरावून घेत आहेत. ब्रिटिशी शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची वैचारिक शक्ती आणि सहनशीलता नष्ट झाली आहे.   

* वर्षभर घेतलेल्या ज्ञानाचा केंद्रबिंदू परीक्षाच का ? *

 आपल्या शिक्षणामध्ये सरकारने तयार केलेला अभ्यासक्रम शिकवला जातो, आणि त्या अभ्यासक्रमादरम्यान नको त्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडून मेहनत करून घेतल्या जाते, त्याही पेक्षा जास्त पैसा उकळला जातो. करोडो करोडो क्विंटल कागद बरबाद केल्या जातो, प्रत्यक्ष ज्ञान मात्र काहीच नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पाठीवर आठ दहा किलोच्या ओझ्या च्या स्कूल बॅग दिल्या जात आहेत . वयाच्या पाचव्या वर्षापासूनच मुलांना असे व जे वाहणारे गुलाम बनविल्या जात आहे. त्या स्कूल बॅगात भरलेले जे वह्या पुस्तके आहेत त्यामध्ये देशाच्या भवितव्याला अनुसरून, व्यक्तीच्या सत्य व्यक्तिमत्त्वाला अनुसरून, न्याय, निती,धर्माला अनुसरून काहीच नाही.  वास्तविक पाहता ह्या वह्या पुस्तकांचा भार शिक्षणाच्या दृष्टीने फारच निरर्थक आहे, आणि त्यावरच सरकार करोडो करोडो रुपये खर्च करीत आहे. हे लोक तर फार मोठे
विज्ञानवादी आहेत असा यांचा समज आहे. ज्यातून काहीच निष्पन्न
 होत नाही म्हणजे परिणाम काहीच निघत नाही अशा निरर्थक गोष्टीला एवढा वेळ आणि खर्च कशाला,  जेथे प्रयोगांती आउटपुट शून्य आहे तेथे भरमसाठ एवढे इनपुट देणे योग्य आहे का?  
 हे शिक्षण व्यवस्थेने कधीतरी तपासून पाहायला हवे,
 पूर्वी कधी भारत देश शिक्षणात इतका मागे पडला नव्हता.
 जेवढा फिरंगी या देशात आल्यानंतर मागे पडला, भारतीय यंत्रणा वर्षानुवर्ष  फिरंगेच्या षडयंत्राला बळी पडली.
 पूर्वी भारत देशात नालंदा तक्षशिलासारख्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या रूपाने शैक्षणिक वैभव होते. ज्यामध्ये देश विदेशातून विद्या ग्रहण करण्यासाठी विद्यार्थी येत असत, जेथे 20 - 20 हजार विद्यार्थी एकाच वेळी पठण पाठण, अभ्यास करत असत.
 परंतु ब्रिटिश शिक्षण पद्धतीला नंतर भारतीय शिक्षण पद्धतीला बेकायदेशीर घोषित केले आणि अभ्यासक्रमही ब्रिटिश शिक्षण प्रणालीनुसार तयार करण्यात आला.
                         आज शिक्षक प्राध्यापक लोक रोज गळा फाडून फाडून शिकवतात पण प्रत्येक वाक्याला परीक्षेत पैकीच्या पैकी गुण घेण्याचा दबाव घालत असतात.
 वर्गात जो विद्यार्थी परीक्षेत जास्त गुण घेईल त्यालाच हुशार समजल्या जाते. आणि इतर विद्यार्थ्यांशी तुलना करणे हा या शिक्षण पद्धतीचा केंद्रबिंदू आहे. मराठी हिंदी इंग्रजी या भाषा आहेत, पण यामध्ये दिलेले घटक त्यामध्ये असणारे ज्ञान काय आहे, ते ज्ञान आत्मसात करून आपण कसे जगावे हे कधी शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांना शिकवत नाही, भाषा विषय लिहिता वाचता बोलता यायला पाहिजे, असेही शिकवल्या जात नाही.
 परंतु पाठाच्या मागे जे प्रश्न उत्तर दिलेले असतात ते लिहून काढणे गाईड मधून लिहिणे आणि वर्षभर घोकम पट्टी करून पाठ करणे यावरच 365 दिवस घातले जातात, वर्षभर घोकून घोकून पाठ केलेलं एक दिवस परीक्षेच्या नावाखाली कागदावर उतरवणे बस ! एवढा शिक्षणाचा उपयोग,,
                           विद्यार्थी पेपर सोडवून एकदा परीक्षा केंद्राच्या बाहेर पडला की पुन्हा त्याचा आणि शिकलेल्या अभ्यासक्रमाचा किंवा सोडवलेल्या प्रश्न उत्तरांचा काही संबंध नाही, आठवीच्या विद्यार्थ्यांना सातवीपर्यंत काय शिकलो त्याचा काही उपयोग नाही किंवा त्याला मागचे काही आठवतही नाही, नववीच्या विद्यार्थ्याला आठवीपर्यंतच्या शिक्षणातले काही आठवत नाही आणि त्याला त्याचा उपयोगही नाही, तर दहावीच्या विद्यार्थ्याला नववीच्या वर्गात काय शिकलो याचा काही उपयोग नाही, अभ्यासक्रमाचा उपयोग फक्त परीक्षेत प्रश्न उत्तर लिहिणे एवढाच केल्या जात आहे.
                                    पूर्वी इयत्ता चौथी पासूनच विद्यार्थ्यांची पाच नापास अशी तुलना केली जायची, जे विद्यार्थी बोर्ड नावाच्या जाळ्यातून पुढे जातील ते अति हुशार आणि गुणवंत समजल्या जायचे , ही परीक्षा पद्धती ज्यांना नापास ठरवायची, नापास म्हणून घोषित करायची त्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळायचा नाही, पुढच्या वर्गात प्रवेश नमिळाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना घरात गल्लीत आणि गावात तसेच शाळेत प्रचंड मानहानीचा सामना करावा लागायचा , अत्यंत लहान वयात  नापास नापास म्हणून त्या विद्यार्थ्यांना डिवचल्या जायचे,, अत्यंत कवळ्या वयात  नापास झाले म्हणून अनेक विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी त्या मुलांना रोज मजुरीच्या किंवा शेतीच्या कामाला लावले,,, शेवटी पास नापासच्या या शिक्षण पद्धतीने त्या कवळ्या वयातील   मुलांचे आयुष्य कायमचे बरबाद 
 केले, जे पास होऊन पुढे गेले त्यांना पुन्हा अडकवण्यासाठी इयत्ता   सातवी  च्या वर्गाला पुन्हा बोर्ड नावाचे जाळे होते,, काही विद्यार्थ्यांना  नापास नापास असे डिवचून  त्यांचे शिक्षण हिरावून घेतल्या जायचे , अनेक मुलांचे आई वडील नापास झाला म्हणून मुलांना प्रचंड मार द्यायचे, काही विद्यार्थी तर निराशे पोटी आणि समाजाने शिक्षकाने केलेल्या अपमानापोटी कायमचे जीवनाला संपवायचे! यातच ही शिक्षण व्यवस्था धन्यता मानायची,,, 
 काही विद्यार्थी सातवी मधून पुढे गेले तर त्यांचे जीवन बरबाद करण्यासाठी पुन्हा इयत्ता दहावीला बोर्ड नावाचे जाळे, फिरंग्यांनी त्यांची शिक्षण पद्धती लादल्यापासून आजतागायत इयत्ता दहावी मध्ये अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य बरबाद केल्या जात आहे.
                एकेकाळी या देशात 16 व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले! 
 याच देशात संत ज्ञानेश्वर महाराजांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला ! आणि आमची शिक्षण व्यवस्था सोळाव्या वर्षी मुलगा दहावीला नापास झाला म्हणून  डिवचून डिवचून त्यांचा बळी घेते. 
  या शिक्षण व्यवस्थेने विद्यार्थ्यांची वैचारिक पातळी पूर्णपणे नष्ट केली आहे.

         *  प्रात्यक्षिकाचा अभाव  * 

                     ब्रिटिश शिक्षण पद्धतीमध्ये सर्व महत्व थेअरीला देण्यात आले आहे. प्रात्यक्षिकाला सध्याच्या अभ्यासक्रमात गौण स्थान आहे , विज्ञानासारखा विषय प्रात्यक्षिका शिवाय शिकविता येत नाही,, परंतु सध्याचे शिक्षण व्यवस्था विज्ञान विषयाला फक्त पुढे ढकलत आहे .. पाठाच्या मागे दिलेले प्रश्न उत्तर पाठ करणे म्हणजे संपला विषय !
                     विद्यार्थ्यांना बायोगॅसची थेरी शिकवल्या जाते आकृती काढायला लावल्या जाते वर्णनही लिहायला शिकवल्या जाते,
 परंतु प्रत्यक्ष मात्र शेण कचरा या मधून बायोगॅस कसा मिळवायचा याची प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना कोणतेही शाळा घेत नाही.
 त्यामुळे विद्यार्थ्यांनी कसा विश्वास ठेवायचा की, सेन आणि कचरा यामधून बायोगॅस मिळविता येतो, का फक्त शिक्षक सांगतात म्हणून गुरूच्या वचनावर विश्वास ठेवायचा,, मंग याला विज्ञानवादी शिक्षण कसे म्हणायचे,, पुढे चालून विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात बायोगॅस चा उपयोग घ्यायचा असेल तर त्याचे ज्ञान शून्य राहील, अशा शून्य ज्ञानामुळेच आज बायोगॅस मागे पडला आहे.
                           कुठेतरी भूगोलासारख्या विषयात भारतातील पिकांची माहिती याविषयी सांगताना कापसाची एखादी ओळ असते, 
 कापूस पिकाचे उपयोग लिहा असा प्रश्न असतो, मानव जात कापूस काही खात नाही म्हणून विद्यार्थी, आज कापसापासून कपडे तयार होतात म्हणून लिहितात. परंतु ते कपडे कसे तयार केले जातात त्याची भारतीय टेक्नॉलॉजी कशी असते सूत कसे कापले जाते चरखा कसा असतो हातमागवर कपडा कसा विणल्या जातो याचे प्रात्यक्षिक कोणते शाळा करून घेत नाही,,
 मग विद्यार्थ्यांनी विश्वास कसा ठेवायचा की कापसापासून कपडे तयार होतात ?? 
 तेल बियांच्या पिकांची माहिती देताना पण असेच आहे, तेलबियांच्या पिकांचे वर्णन करा उपयोग लिहा असा प्रश्न असतो,, परंतु भारतीय टेक्नॉलॉजीने विद्यार्थ्यांना त्या तेलबियांपासून तेल काढायला शिकवले जात नाही,, मग विद्यार्थ्यांनी विश्वास कसा ठेवायचा की तेलबियांच्या पिकांपासून तेल मिळविता येते,,, म्हणजे थोडक्यात सांगायचे झाल्यास ही ब्रिटिश शिक्षण पद्धती प्रात्यक्षिकाला काहीही महत्त्व देत नाही .... प्रात्यक्षिका शिवाय शिक्षण म्हणजे मूर्ती विना मंदिर ,,
            अर्था शिवाय अभ्यासक्रम म्हणजे पाण्याविना नदी !!

अभ्यासक्रमाचे ओझे

 अभ्यासक्रमाचे ओझ


                   लेखक सौ. गायत्री अमोल बिरादार 

आपले मत खालील कमेंटमध्ये लिहा आणि हा लेख अनेक वाचकापर्यंत शेअर करा.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुन्हेगारीला प्रवर्त करणारी शिक्षण पद्धती!

कोयता गॅंग एक भीषण समस्या  कोयता गँग ही एक समाजात भयावह समस्या बनत चालली आहे. त्यामुळे समाजात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होत चालले आहे. राजधानी पासून ते  खेड्यापाड्यापर्यंत कोयता गॅंगने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. अनेक गरीब आणि चांगल्या कुटुंबातील मुले सुद्धा कोयता गँगकडे आकर्षले जात आहेत. ही गोष्ट त्या मुलांच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी चिंतेचा विषय बनत आहे. * विश्वाला अहिंसेची शिकवण देणारा भारत देश *  एकेकाळी संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे गौतम बुद्ध भारत देशात जन्मले. भगवान गौतम बुद्धाने विश्वाला शांततेचा संदेश देऊन जगाच्या पाठीवर भारत देशाची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज लोकं धर्माधर्मात भांडून हिंसेला खतपाणी घालत आहेत भगवान गौतम बुद्धांनी धर्माबरोबरच शांती शिकवली आहे, शांती हाच धर्म आहे.  म्हणून जगाने हृदयापासून भगवान बुद्धाला स्वीकारलं आहे. आजही विश्वभरातून एकच नाद घुमतो की " युद्ध नको बुद्ध हवा "    असे शांततेचे संदेश आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये आज कुठेही दिसत नाहीत पावलोपावली दिसते ती फक्त स्पर्धा आणि स्पर्धा विद्यार्थ्यांना एकमेकांशी...

मकोका म्हणजे काय?

महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राइम ऍक्ट    मकोका म्हणजे काय ?  मकोका कधी लागतो ?   मकोका कारवाई कुणावर होते .  मकोका कारवाई झाल्यानंतर आरोपीला कोणती शिक्षा होते..   कायदा   https://youtube.com/@avirat.biradar2021?si=UHBCkTgiRKJAmA1m * मकोका म्हणजे काय :-  महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ऍक्ट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा म्हणजेच मकोका होय.  राज्य सरकारने संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी मकोका कायदा हा करण्यात आला.  मकोका कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालतो.   * मकोका कधी लागतो :-  गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते . पण या संधीचा गैरफायदा घेऊन तो आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवर येतो . आरोपीवर अटकेची व तडीपारची देखील कारवाई होते . अशा आरोपींना अटक केली जाते तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास आरोपीवर तडीपाराची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपी मध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलिसांना मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आह...

लबाड आणि लुटारू शिक्षण व्यवस्था

सध्या शिक्षण व्यवस्थेमध्ये लबाड , खोटे - नाटे बोलून विद्यार्थी आणि पालक वर्गाला लुटत राहणे हा व्यापारच झाला आहे का ?  शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, पण हे दूध मात्र ज्यांच्याकडे धनाचा साठा भरमसाठ आहे , आणि जो छुप्या मार्गाने शिक्षण यंत्रणेला  देऊ शकतो त्यालाच हे वाघिणीचे दूध दिले जात आहे का ? असा भयानक प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे .  आज समाजामध्ये मुठभर बुद्धिजीवी लोक शिकून सवरून मोठे होत आहेत . परंतु त्यांच्यासाठी आणखीन एक परीक्षा लावली जात आहे . ती परीक्षा म्हणजे धनसंपत्ती परीक्षा !  ज्यांच्याजवळ जेवढा जास्त पैसा त्याची तेवढी जास्त गुणवत्ता ! गुणवत्तेच्या यादीत पहिल्या क्रमांकावर त्याचेच नाव  छुप्या मार्गाने जो पैशाच्या गरम नोटा शिक्षण यंत्रणेला नेवून देईल .  वैद्यकीय , अभियांत्रिकी  महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी  वीस पंचवीस लाखापासून करोडो रुपये मोजावे लागतात . जर विचार केला तर खरंच एका विद्यार्थ्यामागे करोडो रुपये खर्च शिक्षण व्यवस्था करते का ? शिक्षण व्यवस्थेने यावर कधी आत्मपरीक्षण केलं आहे का ? अशी लाखो करोडो रुपये भरण्याइतपत सर्वसाधार...