https://www.facebook.com/amol.biradar.9?mibextid=JRoKGi
चरित्रहीन पाश्चात संस्कृतीचे शिक्षण
समस्त विश्वाला दीपावणारी अशी भारतीय संस्कृती होती परंतु ब्रिटिश शिक्षण पद्धतीने भारतीय संस्कृती मोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ब्रिटिश शिक्षण पद्धती पूर्णपणे असहंस्कारीत असून.विद्यार्थ्यांना आणि समाजाला भौतिक वादाच्या भोगविलासाकडे घेऊन जात आहे.
ब्रिटिश शिक्षण पद्धतीचा उद्देशच हा आहे की विषमतेला खतपाणी घालणारे आणि विषय वासनेने ओतप्रोत भरलेले जीवन प्राप्त करणे, विषय वासनेने पिसाळलेल्या चरित्रहीन पाश्चात संस्कृतीचे शिक्षण आज आपल्या भारत देशात दिले जात आहे.
ब्रिटिश शिक्षण पद्धतीमुळे भारतीय जन माणसाची जीवनशैलीच बदलून गेली आहे. कधीही उठायचं आणि कधीही झोपायचं, व तसेच काहीही खायचं आणि काहीही प्यायचं. आजारी पडा आणि भरपूर औषध गोळ्या घ्या या त्री सूत्रामध्ये माणसाची जीवनशैली बांधली गेली आहे.
जशी जशी भारतीय माणसाची जीवनशैली बदलत गेली,तशी तशी भारतीय संस्कृती नष्ट होत गेली, मुला मुलींचे सगळेच शाळा, महाविद्यालय स्वतंत्र नाहीत. शाळा महाविद्यालयांना भारतीय पोशाखांची सक्ती नाही त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पाश्चात पोशाखांचा सुळसुळाट वाढला. भरपूर अंग प्रदर्शन करणारे पोशाख हे प्रतिष्ठेचा विषय बनला आहे.
त्यामुळे भारतीय पोशाख पद्धती खूपच दुर्मिळ झाली आहे. या विनाशी संस्कृती पासून भारत देश कसा वाचू शकेल हे फारच कठीण वाटत आहे.
![]() |
| विदेशी संस्कृती |
लेखक - गायत्री अमोल बिरादार


खूप छान फार महत्त्वाचा लेख आहे ...
उत्तर द्याहटवा