प्रचलित शिक्षण व्यवस्था, व्यवस्थेतील सर्वच शिक्षक,अधिकारी आणि विद्यार्थी सगळेच्या सगळे बंदिस्त आहेत.एक गुलाम व्यवस्था संपूर्ण जनसमुदायाला स्वातंत्र्याचे धडे कसे देऊ शकेल? एक गुलाम शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र,स्वायत्त आणि स्वावलंबी होण्याचे अमृतपान कसे देऊ शकेल?
![]() |
| बंदिस्त शिक्षण |
जरी एखाद्या शिक्षकाला जाणीव झाली तरी तो विद्यार्थ्यांना स्वतंत्र स्वावलंबी होण्याचे शिक्षण देऊ शकणार नाही कारण तो सरकारी नोकरदार आहे आणि त्यांला साचेबद्ध कागदी नियमात बांधलेल्या अभ्यासक्रमाचे ज्ञान देण्याचा आदेश आहे.शिक्षण व्यवस्थेतील शिक्षक गुलामगिरीच्या पिंजऱ्यात असल्यामुळे आणि दडपशाहीत असल्यामुळे अनेक वेळा त्यांना नको असलेली कामे करावी लागतात उदाहरणार्थ असे काही शिक्षक असतात की त्यांचा राजकारणाशी काही संबंध नसतो परंतु त्यांचे संस्थाचालक राजकारणामध्ये असतात त्यामुळे त्यांना राजकीय प्रचारात फिरावे लागते केवळ प्रचारात नाही तर निवडणुकीच्या काळात अनेक छुप्या जबाबदाऱ्या संबंधित शिक्षकावर असतात म्हणजेच हे गुलामगिरीचे ज्वलंत उदाहरण आहे लोकांना दारू पाजवून, मास-मदिरा खाऊ घालून, मूर्ख बनवून, आपली राजकीय सत्ता निर्माण करणाऱ्या या संस्थाचालकांच्या प्रचारासाठी एका शिक्षकाला किंवा प्राध्यापकाला आपल्या इमानदारीचा, नीती धर्मांचा,स्वाभिमानाचा, सर्वधर्मसमभावतेचा, नीती मूल्यांचा या संस्थाचालकाच्या राजकीय यज्ञामध्ये होम करावा लागतो शेवटी एक स्वाभिमानी इमानदार शिक्षक राजकीय संस्थाचालकांचा गुलाम बनतो. शिक्षकांना सरकारचे दडपण, शिक्षण मंत्र्याचे दडपण, अधिकाऱ्यांचे दडपण, संस्थाचालकाचे दडपण, पालकांचे दडपण, राजकीय पुढाऱ्यांचे दडपण अशी कितीतरी गुलामगिरी भोगणाऱ्या शिक्षकांची भूमिका देशाला विद्यार्थ्यांला स्वतंत्र व स्वाभिमानाचा धडा एक शिक्षक म्हणून कसा देऊ शकेल याचा विचार देखील करवत नाही. अनेक शिक्षकांना संस्थाचालकांच्या घरचे कामेही सांगितले जातात उदाहरणार्थ - संस्थाचालकाच्या घरी पाणी भरणे, त्यांच्या घरातला किराणा भरणे त्यांच्या घरातला भाजीपाला आणून देणे, बर्थडे पार्टीचे काम,लग्न समारंभातली काम असे एक ना अनेक कामे संस्थाचालकाच्या दडपणाखाली एका शिक्षकाला पार पाडावी लागतात. मुळात शिक्षक स्वतःच सरकारने कागदी आराखड्यावर तयार केलेला साचेबद्ध अभ्यासक्रम शिकवतात. त्यामुळे ते स्वतः एक गुलाम म्हणून जगत आहेत शिक्षकांना भानच नाही की स्वतःची स्वतंत्र विचारशैली आणि आकलन शक्ती असते जी अवस्था आज शिक्षकांची झाली आहे तीच अवस्था आज पालकांची झाली आहे.
![]() |
| जुलमी शिक्षण |


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा