मुख्य सामग्रीवर वगळा

खर्चिक आणि महागडे शिक्षण पद्धती

सध्याच्या महागड्या शिक्षण व्यवस्थेने पालकांची अशी थट्टा मांडली आहे

श्रीमंत पालक
 श्रीमंत पालक 
 

1) आपण थोडसं शिक्षण व्यवस्थेवर नजर टाकली तर असे दिसून येईल की जनसामान्य आणि गरीब लोक यांची या व्यवस्थेने थट्टाच मांडली आहे. 

2) आपल्या मुलांच्या वजनाएवढा पैसा ही शिक्षण व्यवस्था पालकांकडून उकळत आहे बालवाडी पासून ते पदवी पर्यंत कोणतेही शिक्षण पैसे ओतल्या शिवाय मिळत नाही. 

ही शिक्षण व्यवस्था इंग्रजी बनावटीची असल्यामुळे ती लोकशाहीला घातकच ठरत आहे. 

3) इंग्रजी राजवटीमध्ये नेहमीच पुंजीपती, अधिकारी, सत्ताधारी, सावकार, मोठे जमीनदार, नोकरदार नेहमीच राज्य करतात आणि आपल्यापेक्षा अप्रगत दिसणाऱ्या पालक वर्गाला अथवा समाजाला नेहमीच दाबून ठेवतात अप्रगत दिसणाऱ्या समाजाला आणि पालक वर्गाला दाबून ठेवण्याची ही प्रणाली मानवतेच्या आणि समानतेच्या विरुद्ध आहे. 

4) जो वर्ग प्रगत आणि शिक्षित आहे त्यांचेच मुले यशाचे मानकरी ठरत आहेत त्यांच्या यशाच्या मुळाशी गेलो तर त्यांचे कारण फक्त पैसा हेच सापडत आहे उदाहरणात एक एमबीबीएस डॉक्टर व्हायच जर असेल तर एक कोटी रुपये मोजावे लागत आहेत.

5)  सामान्य घरातील विद्यार्थी याची कल्पनाही करू शकत नाही जरी एखाद्या सामान्य घरात एखादा हुशार मुलगा मोठा डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न साकरा करू  इच्छित असेल तर त्याच्या पालकाला आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी घरची शेतीबाडी गमवावी लागत आहे. 

6) मुलाच्या शिक्षणासाठी पालकाला घराची राख रांगोळी करून शिक्षण व्यवस्थेची भरती करावी लागत आहे. 

7) अशा महागड्या शिक्षण व्यवस्थेमध्ये गरीब आणि श्रीमंती अशी मोठी दरी निर्माण झाली आहे. एकीकडे श्रीमंत पालक वर्ग आपल्या पाल्याच्या शिक्षणावर नको तेवढा खर्च करत आहे. 

8) एका एका विषयासाठी एक एक लाख खर्च करून खाजगी शिकवणी लावणे हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. तर दुसरीकडे आपल्या मुलाला पुस्तक मिळतील की नाही पुस्तक मिळाले तर वह्या,पेना,गणवेश आणि खाजगी शिकवणी हे कुठून पूर्ण करायची म्हणून सामान्य पालक चिंताग्रस्त आहे. 

9) अशा प्रकारे शिक्षणाचा खर्च प्रचंड वाढला आहे. एकंदरीत शिक्षण व्यवस्थेने सामान्य पालक वर्गाची अशा प्रकारे थट्टाच मांडली आहे.

गरीब पालक
 गरीब पालक 

                                              
                                लेखक - गायत्री अमोल बिरादार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुन्हेगारीला प्रवर्त करणारी शिक्षण पद्धती!

कोयता गॅंग एक भीषण समस्या  कोयता गँग ही एक समाजात भयावह समस्या बनत चालली आहे. त्यामुळे समाजात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होत चालले आहे. राजधानी पासून ते  खेड्यापाड्यापर्यंत कोयता गॅंगने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. अनेक गरीब आणि चांगल्या कुटुंबातील मुले सुद्धा कोयता गँगकडे आकर्षले जात आहेत. ही गोष्ट त्या मुलांच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी चिंतेचा विषय बनत आहे. * विश्वाला अहिंसेची शिकवण देणारा भारत देश *  एकेकाळी संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे गौतम बुद्ध भारत देशात जन्मले. भगवान गौतम बुद्धाने विश्वाला शांततेचा संदेश देऊन जगाच्या पाठीवर भारत देशाची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज लोकं धर्माधर्मात भांडून हिंसेला खतपाणी घालत आहेत भगवान गौतम बुद्धांनी धर्माबरोबरच शांती शिकवली आहे, शांती हाच धर्म आहे.  म्हणून जगाने हृदयापासून भगवान बुद्धाला स्वीकारलं आहे. आजही विश्वभरातून एकच नाद घुमतो की " युद्ध नको बुद्ध हवा "    असे शांततेचे संदेश आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये आज कुठेही दिसत नाहीत पावलोपावली दिसते ती फक्त स्पर्धा आणि स्पर्धा विद्यार्थ्यांना एकमेकांशी...

मकोका म्हणजे काय?

महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राइम ऍक्ट    मकोका म्हणजे काय ?  मकोका कधी लागतो ?   मकोका कारवाई कुणावर होते .  मकोका कारवाई झाल्यानंतर आरोपीला कोणती शिक्षा होते..   कायदा   https://youtube.com/@avirat.biradar2021?si=UHBCkTgiRKJAmA1m * मकोका म्हणजे काय :-  महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ऍक्ट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा म्हणजेच मकोका होय.  राज्य सरकारने संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी मकोका कायदा हा करण्यात आला.  मकोका कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालतो.   * मकोका कधी लागतो :-  गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते . पण या संधीचा गैरफायदा घेऊन तो आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवर येतो . आरोपीवर अटकेची व तडीपारची देखील कारवाई होते . अशा आरोपींना अटक केली जाते तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास आरोपीवर तडीपाराची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपी मध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलिसांना मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आह...

लबाड आणि लुटारू शिक्षण व्यवस्था

सध्या शिक्षण व्यवस्थेमध्ये लबाड , खोटे - नाटे बोलून विद्यार्थी आणि पालक वर्गाला लुटत राहणे हा व्यापारच झाला आहे का ?  शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, पण हे दूध मात्र ज्यांच्याकडे धनाचा साठा भरमसाठ आहे , आणि जो छुप्या मार्गाने शिक्षण यंत्रणेला  देऊ शकतो त्यालाच हे वाघिणीचे दूध दिले जात आहे का ? असा भयानक प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे .  आज समाजामध्ये मुठभर बुद्धिजीवी लोक शिकून सवरून मोठे होत आहेत . परंतु त्यांच्यासाठी आणखीन एक परीक्षा लावली जात आहे . ती परीक्षा म्हणजे धनसंपत्ती परीक्षा !  ज्यांच्याजवळ जेवढा जास्त पैसा त्याची तेवढी जास्त गुणवत्ता ! गुणवत्तेच्या यादीत पहिल्या क्रमांकावर त्याचेच नाव  छुप्या मार्गाने जो पैशाच्या गरम नोटा शिक्षण यंत्रणेला नेवून देईल .  वैद्यकीय , अभियांत्रिकी  महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी  वीस पंचवीस लाखापासून करोडो रुपये मोजावे लागतात . जर विचार केला तर खरंच एका विद्यार्थ्यामागे करोडो रुपये खर्च शिक्षण व्यवस्था करते का ? शिक्षण व्यवस्थेने यावर कधी आत्मपरीक्षण केलं आहे का ? अशी लाखो करोडो रुपये भरण्याइतपत सर्वसाधार...