मुख्य सामग्रीवर वगळा

राज्यकारभाराची सदोष पद्धती आणि सध्याची शिक्षण पद्धती

1.गेल्या पन्नास वर्षांमध्ये आपला भारत देश अधिक अधिक गरीब झाला आहे.

2.भारत देशातील माणस स्वतःचं संरक्षण स्वतः  करण्यात अपात्र ठरत आहेत.

3.आपली मुले राष्ट्रभावना विसरताना दिसत आहेत हे सर्व राज्यकारभाराच्या सदोष पद्धतीमुळे घडत आहे.

4. राज्यकारभाराच्या सर्वात सदोष भाग म्हणजे सध्याची शिक्षण व्यवस्था.

ताण तणाव

 ताण तणाव 

सध्याच्या शिक्षण पद्धतीवर एक नजर टाकली तर असे दिसून येते की दिवसभर वर्गात बसून कागदी घोडे नाचविणे क्विंटल क्विंटल कागद गिरवणे शिकवलेले घोकंमपट्टी करू करू पाठ करणे आणि वर्षभर केलेली घोकंपट्टी परीक्षेच्या नावाखाली एक दिवस कागदावर उतरवणे आणि निकालाची वाट पाहत राहणे विद्यार्थ्यांसाठी निकालाचा दिवस म्हणजे पास- नापासांचा खेळ बनला आहे.

प्रचलित शिक्षण पद्धती ही हा पास - नापासांचा खेळ विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळत आहे. 

लाखो विद्यार्थ्यांमधून बोटावर मोजण्याइतके विद्यार्थी पुढच्या वर्गात बसण्यास पात्र होतात. 

उर्वरित विद्यार्थ्यांना सदरील शिक्षण व्यवस्था नापास म्हणून घोषित करते आणि त्या मुलांना आत्महत्येस प्रवृत्त करते. हा विद्यार्थ्यांचा दोष नसून राज्यकारभारातील शिक्षण व्यवस्थेचा दोष आहे.

 

हतबल

 हतबल 


                     लेखक - सौ गायत्री अमोल बिरादार 
 

तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर खालील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुन्हेगारीला प्रवर्त करणारी शिक्षण पद्धती!

कोयता गॅंग एक भीषण समस्या  कोयता गँग ही एक समाजात भयावह समस्या बनत चालली आहे. त्यामुळे समाजात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होत चालले आहे. राजधानी पासून ते  खेड्यापाड्यापर्यंत कोयता गॅंगने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. अनेक गरीब आणि चांगल्या कुटुंबातील मुले सुद्धा कोयता गँगकडे आकर्षले जात आहेत. ही गोष्ट त्या मुलांच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी चिंतेचा विषय बनत आहे. * विश्वाला अहिंसेची शिकवण देणारा भारत देश *  एकेकाळी संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे गौतम बुद्ध भारत देशात जन्मले. भगवान गौतम बुद्धाने विश्वाला शांततेचा संदेश देऊन जगाच्या पाठीवर भारत देशाची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज लोकं धर्माधर्मात भांडून हिंसेला खतपाणी घालत आहेत भगवान गौतम बुद्धांनी धर्माबरोबरच शांती शिकवली आहे, शांती हाच धर्म आहे.  म्हणून जगाने हृदयापासून भगवान बुद्धाला स्वीकारलं आहे. आजही विश्वभरातून एकच नाद घुमतो की " युद्ध नको बुद्ध हवा "    असे शांततेचे संदेश आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये आज कुठेही दिसत नाहीत पावलोपावली दिसते ती फक्त स्पर्धा आणि स्पर्धा विद्यार्थ्यांना एकमेकांशी...

मकोका म्हणजे काय?

महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राइम ऍक्ट    मकोका म्हणजे काय ?  मकोका कधी लागतो ?   मकोका कारवाई कुणावर होते .  मकोका कारवाई झाल्यानंतर आरोपीला कोणती शिक्षा होते..   कायदा   https://youtube.com/@avirat.biradar2021?si=UHBCkTgiRKJAmA1m * मकोका म्हणजे काय :-  महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ऍक्ट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा म्हणजेच मकोका होय.  राज्य सरकारने संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी मकोका कायदा हा करण्यात आला.  मकोका कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालतो.   * मकोका कधी लागतो :-  गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते . पण या संधीचा गैरफायदा घेऊन तो आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवर येतो . आरोपीवर अटकेची व तडीपारची देखील कारवाई होते . अशा आरोपींना अटक केली जाते तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास आरोपीवर तडीपाराची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपी मध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलिसांना मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आह...

लबाड आणि लुटारू शिक्षण व्यवस्था

सध्या शिक्षण व्यवस्थेमध्ये लबाड , खोटे - नाटे बोलून विद्यार्थी आणि पालक वर्गाला लुटत राहणे हा व्यापारच झाला आहे का ?  शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, पण हे दूध मात्र ज्यांच्याकडे धनाचा साठा भरमसाठ आहे , आणि जो छुप्या मार्गाने शिक्षण यंत्रणेला  देऊ शकतो त्यालाच हे वाघिणीचे दूध दिले जात आहे का ? असा भयानक प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे .  आज समाजामध्ये मुठभर बुद्धिजीवी लोक शिकून सवरून मोठे होत आहेत . परंतु त्यांच्यासाठी आणखीन एक परीक्षा लावली जात आहे . ती परीक्षा म्हणजे धनसंपत्ती परीक्षा !  ज्यांच्याजवळ जेवढा जास्त पैसा त्याची तेवढी जास्त गुणवत्ता ! गुणवत्तेच्या यादीत पहिल्या क्रमांकावर त्याचेच नाव  छुप्या मार्गाने जो पैशाच्या गरम नोटा शिक्षण यंत्रणेला नेवून देईल .  वैद्यकीय , अभियांत्रिकी  महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी  वीस पंचवीस लाखापासून करोडो रुपये मोजावे लागतात . जर विचार केला तर खरंच एका विद्यार्थ्यामागे करोडो रुपये खर्च शिक्षण व्यवस्था करते का ? शिक्षण व्यवस्थेने यावर कधी आत्मपरीक्षण केलं आहे का ? अशी लाखो करोडो रुपये भरण्याइतपत सर्वसाधार...