तुम्हाला माझी आणखीन ब्लॉक व्हायचे असतील तर या लिंक वर क्लिक करा. https://draft.blogger.com/u/1/blog/post/edit/1317193413583215689/9003872123497158672
सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये शारीरिक स्वास्थ्याचा आणि शिक्षणाचा कुठेही संबंध दिसत नाही.
सध्याच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मानवी आरोग्याला महत्व दिले जात नाही मोठ मोठाले प्राध्यापक,वकील, डॉक्टर, इंजिनीअर्स, अधिकारी व तसेच उद्योगपती यांना भरमसाठ पैसा कमावण्याचे ज्ञान आहे परंतु आरोग्याचे कसलेही ज्ञान नाही. असे अनेक डॉक्टर आहेत की ज्या रोगाचे तज्ञ आहेत त्याच रोगांनी ते स्वतःच ग्रस्त आहेत उदाहरणार्थ एखादा डॉक्टर नेत्र विकार तज्ञ असतो पण त्यांना स्वतः चष्मा लावल्याशिवाय दिसत नाही, अनेक शुगर स्पेशलिस्टांना शुगरची गोळी घेतल्याशिवाय भागत नाही, अनेक मूळव्याध तज्ञ दैनंदिन जीवनात मुळव्याधीने त्रस्त आहेत. हा विषय विचार करण्यासारखा आहे याचे कारण त्या डॉक्टरांना आजारांवर उपचार करण्याचे शिक्षण मिळाले परंतु आजारी न पडण्याचे शिक्षण त्यांना मिळालेच नाही. डॉक्टर लोकांच्या जीवनामध्ये या समस्या जर असतील तर इतर लोकांचा विषय याहीपेक्षा गंभीर आहे. या लोकांना शिक्षित होण्याचे ज्ञान मिळाले परंतु खाण्यापिण्याचे, झोपण्या उठण्याचे, रहाण-सहान, कपड्या लत्याचे ज्ञान मिळालं नाही. बरेचसे आजार ते जे कपडे वापरतात त्या कपड्यातूनच आजार उदभवतात उदाहरणार्थ त्वचाविकार जीन्स कपडे,पॉलिस्टर कपडे. खाण्यापिण्याचे ज्ञान सुद्धा कोणत्याही शाळा कॉलेजात दिले जात नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे हॉटेलचे खाणे आणि मसणात जाणे घरी शुद्ध सात्विक आहार असूनही हॉटेल कडे झुंडच्या झुंड जाताना दिसत आहेत आणि सर्वाधिक बिमारी उदभवण्याचे कारण हे बाहेरील खाणे आणि अवेळी खाने हे ठरत आहे.बहुतांश श्रीमंत लोक जास्तीचा आणि चुकीचा आहार घेतल्यामुळे बिमार पडत आहेत तर बहुतांश गरीब लोक असंतुलित आणि कुपोषित आहाराने बिमार पडत आहेत.एकीकडे अति खाल्ल्यामुळे लोक बिमार पडत आहेत तर दुसरीकडे अन्न मिळत नसल्यामुळे बिमार पडत आहेत.परंतु यामध्ये आहार शास्त्राचे शिक्षण मात्र शाळा कॉलेजात दिले जात नाही.
![]() |
| बाहेरील खाद्यपदार्थ |
लेखक - गायत्री अमोल बिरादार


खूप छान सत्य वस्तू स्थिती आशिच आहे सध्या
उत्तर द्याहटवाधन्यवाद आपण प्रतिक्रिया दिलात त्याबद्दल...बदल घडवायचे आहेत दादा... अजून खूप लिहायचं आहे सध्या सुरुवात केली आहे 👌
हटवा