मुख्य सामग्रीवर वगळा

सामाजिक विषमतेची दरी निर्माण करणारे शिक्षण :-

शिक्षण व्यवस्थेद्वारे समाजात सामाजिक विषमतेची दरी का निर्माण केली जात आहे.
 

आज समाजात शिक्षणामुळे माणूस घडतो असे आपण क्षणाक्षणाला म्हणतो , ते प्रत्येकाला खरे ही वाटते,म्हणून शिक्षण हे आपल्या जीवनाची पोषक तत्व आहे असे मानतो.


शिक्षणामुळे माणूस सामाजिक बांधिलकी जोपासतो , शिक्षणामुळे माणसाला समाजाबद्दल प्रेम निर्माण होते असेही आपण ऐकतो , परंतु हल्ली परिस्थिती मात्र वेगळी आहे. सध्याच्या शिक्षण पद्धतीत सामाजिकतेला कुठेच स्थान दिसत नाही .

शिक्षण प्रक्रियेतून सामाजिक बांधिलकी पूर्णपणे दुर्लक्षित :-

कधीकाळी शिक्षणाची आणि शिक्षकांची आस्था एवढी सुदृढ होती की , विद्यार्थ्यांना उन्नत करून त्यांना स्वावलंबी , प्रामाणिक , इमानदार माणूस बनवण्याची जबाबदारीच गुरुजी , शिक्षकांची होती परंतु आजचे दृश्य विरोधाभास निर्माण करणारे झाले आहे . खऱ्या अर्थाने आजचे दृश्य विपरीत आहे . आज आमचे , शिक्षक आणि प्राध्यापक हे महिन्याचा पगार उचलण्यापुरते मर्यादित झालेले दिसत आहे . आणि विद्यार्थी - विद्यार्थी  तर फक्त पदवीचे ( डिग्री ) प्रमाणपत्र गळ्यात बांधून नोकरीसाठी झुंजत राहण्यापुरतेच मर्यादित झाले आहे. 

शिक्षण आणि विद्यार्थी यांच्यातील स्नेहाची गंगा अटत चालली आहे .

 सध्या शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात प्रेम , आपुलकी मान सन्मानाचे नाते पाहायला मिळत नाही . दोघांमध्ये प्रचंड विषमता निर्माण झाली आहे . सरकारी नोकरदार , शिक्षक प्राध्यापकांचे पगार प्रचंड वाढल्यामुळे त्यांच्यामधील कर्तव्याची गरज ही गोष्ट संपली आहे .
 त्यांची पूर्णपणे अशी खात्री झाली आहे की आम्ही विद्यार्थ्यांना कमी शिकवले काय आमची आम्हाला पगार मिळणारच आहे . असे शिक्षक कधीही पाहायला मिळाले नाही की , उदाहरणार्थ पूर्वी तीस हजार पगार होती, परंतु शाळेचा वेळ हा दहा ते चार होता पण आता 70 हजार पगार झाली, तर सकाळी दहा वाजता ऐवजी सात वाजता शाळेत हजर राहून दररोज तीन ते चार तास मुलांना जास्तीचे शिकवतात ! 
      सामाजिक , राष्ट्रीय एकतेचे , सदाचाराचे , कर्तव्यदक्षतेचे मुलांना धडे देतात . समाजाने माझ्या पगारात दुपटीने वाढ केली आहे . तर त्यांच्या मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण देऊन एक प्रकारे समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करतो , असा शिक्षक प्राध्यापक पाहायलाही मिळाला नाही . उलट मी माझ्या डोळ्याने पाहिले आहे की , अगदी शाळेच्या तुरंत वेळेवरच शाळेत यायचे , आणि शाळाची वेळ संपण्याची वाट बघत घड्याळाकडे बघत बसायचे , काही शाळा अशा आहेत की , शाळा संपण्याची वेळ दुपारी चार वाजता असेल तर , तीन वाजता पासूनच सर्व शिक्षक , शिक्षिका कार्यालयात एका ठिकाणी बसून सारखे घड्याळाकडे बघत बसतात . एकदम चार वर घड्याळाचा तास काटा गेला म्हणजे विद्यार्थ्यांच्या आधी पळत सुटायला मोकळे !
 म्हणजेच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील किती मोठी विषमता आहे ही !
 शिक्षकांमध्ये शाळां आणि घर यांच्यातसुद्धा विषमता पाहायला मिळते , काही शिक्षक प्राध्यापकांना शाळा सोडून पटकन घराकडेच धाव घ्यायला आवडत आहे . वास्तविक पाहता त्यांच्या घरामुळे शाळा नाही तर शाळेमुळे त्यांना आलिशान घर प्राप्त झाले आहे , त्यामुळे शिक्षक प्राध्यापकांची धाव ही घरापेक्षा शाळेकडे असायला पाहिजे . काही शाळांमध्ये तर कधी कधी काहीच न शिकविता फक्त उपस्थित सही करण्याचेही पगार मिळतात .

" राष्ट्र भिकारी झाले तरी चालेल , गरीब , सामान्य माणूस मेला तरी चालेल , देश विकायची वेळ आली , देशावर कर्जाचा डोंगर झाला तरी चालेल परंतु सरकारी नोकरदाराला सुट्ट्यात चैन मोज मजा आराम करण्याचाही पगार मिळतो ."

                                 दिवसभर राबराब काबाडकष्ट करून रात्री बे रात्री अंधाऱ्या रात्री शेताच्या , मातीच्या दांडावरती भरल्या हिरव्या गार पिकात काळाकुट्ट अंधारात सर्पा , विंचूच्या इलाख्यात कुडकुडणाऱ्या कडक थंडीत जेव्हा शेतकरी पिकाला पाणी देऊन पोटच्या लेकरासारखे त्या पिकाला वाढवतो , ऊन-वारा , पाऊस ,थंडी , विजा , वादळ यांचे आघात सहन करून धान्याची रास करतो शाळेत जाणाऱ्या आपल्या पोटच्या लेकराचे स्वप्न उराशी घेऊन धान्याची रास बाजारात घेऊन जातो तेव्हा सरकारकडून शेतकऱ्यांच्या धान्याला कवडीमोल किंमत दिली जाते . एकीकडे कलेक्टर , तहसीलदार पासून लोकप्रतिनिधी पर्यंत बेहिशोब पगार दिला जातो हे अर्थव्यवस्थेच्या कोणत्या हिशोबात बसते ?
           शिक्षण पद्धतीमध्ये श्रमजीवी आणि बुद्धिजीवी अशी विषमता निर्माण का केली जात आहे ?
            विषमता नावाची समस्या समाजात कलंक बनत चालली आहे ही ही विषमतेची दरी आपणाला नष्ट करता आली पाहिजे , आपण समाजाचा एक घटक आहोत ; त्यामुळे आपले समाजाप्रती प्रेम जागृत झाले पाहिजे ,
 शिक्षण व्यवस्थेने ही विषमता नष्ट करून समाजात समानतेची शिकवण दिली तर विद्यार्थ्यांचे आणि समाजाचे भविष्य अधिक उज्वल होईल , यात तीळ मात्र शंका नाही .
 समाजातील अशी विषमता नष्ट करण्याचे काम शिक्षण व्यवस्थेबरोबरच तुमच्या आमच्या सर्वांच्या हाती आहे .
 आजच आपले कर्तव्य ओळखा , सामाजिक बांधिलकी जोपासा आणि समाजाप्रती आपले  शिक्षक , गुरुजन , विद्यार्थी यांच्यात मान सन्मानाचे नाते निर्माण करा ! 
                               आपले असे स्नेहाचे नाते नक्कीच राष्ट्रीय एकात्मतेकडे घेऊन जाईल.
                              एक पाऊल राष्ट्रीय एकात्मतेकडे .

  
तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेंट मध्ये लिहा आणि हा लेख अनेकांना शेअर करा .
         
                               लेखक सौ. गायत्री अमोल बिरादार 

जगाचा पोशिंदा आणि त्याचा इमानदार साथीदार

" जगाचा पोशिंदा आणि त्यांचा इमानदार साथीदार "




           

         




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा