स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिक्षण घेऊन शेवटी परावलंबी बनवून ठेवते ते शिक्षण काय कामाचे ?
ब्रिटिश शिक्षण पद्धतीतील म्हणजे आजच्या शिक्षण पद्धतीतील सगळ्यात मोठा दोष म्हणजे हे शिक्षण विद्यार्थ्यांना जन्मभर परावलंबी बनवत आहे . सध्याचे शिक्षण ही निव्वळ पुस्तकी ज्ञान आहे . त्यामध्ये कर्तव्याला , मनगटाच्या ताकतीला थोडेही महत्व दिले नाही , वर्गात शिक्षकांनी शिकवलेले फक्त पाठ करणे आणि 365 दिवस कागदी घोडे नाचवत राहणे याव्यतिरिक्त आजच्या शिक्षणात इतर काहीच नाही . संगीत , गायन - वादन , वकृत्व - नेतृत्व , कर्तृत्व - दातृत्व विकसित करणारे शिक्षण तर कधी स्वप्नातही दिसत नाही. फक्त कागदी घोडे नाचवत राहणे विद्यार्थ्यांच्या हातातील, अंगातील कला विकसित होऊन स्वावलंबी जीवन जगेल अशी शिक्षण पद्धती आज कोठेच दिसत नाही.
त्यामुळे "आपले कर्तव्य पालन करण्याचे सामर्थ्य आम्हाला लाभत नाही " ( महात्मा गांधी )
आज उघड्या डोळ्यांनी आपण पाहतो की सकाळी दहा वाजता पासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शाळेत विद्यार्थ्यांना फक्त कागद काळे करायची सवय लावली जाते, सध्या शाळेत महाविद्यालयात जे शिक्षण दिले जाते,त्यामध्ये फक्त दहा टक्के शिक्षण हे जीवनावश्यक असते,दुर्दैव असे की त्या दहा टक्के शिक्षणालाही कृतीची जोड नसते. उदाहरणार्थ :सर्व जीवनसत्वे, जीवनसत्वाचे स्त्रोत शिकविलेले जातत, वेगवेगळे फळे भाज्या व त्यामध्ये असणारी जीवनसत्वे शिकविले जातात, त्यावर परीक्षा गृहपाठ मध्ये प्रश्न ही विचारले जातात परंतु प्रत्यक्ष शाळेच्या भव्य मैदानात एक कोपरा ही त्या फळे भाज्यासाठी नसतो की विद्यार्थ्यांना प्रयोग दाखविता येतील त्या त्या फळे भाज्या पालेभाज्या त्यांच्या बिया यांची प्रत्यक्ष ओळख आणि निर्मिती करता येईल उदाहरणात : रासायनिक खताची जमिनीवर आणि मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम शिकविल्या जातात परंतु सेंद्रिय आणि नैसर्गिक खते तयार करण्याचे प्रयोग घेतले जात नाहीत. सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे जमिनीत अधिक सुपीक बनते तसेच सेंद्रिय खतावरील भाजीपाला अधिक पौष्टिक असतो अशा गप्पा पुस्तकांमध्ये अभ्यास म्हणून देणे आणि सेंद्रिय खते तयार करण्याचे प्रयोग करून न घेणे हे शैक्षणिक मूल्यमापनाच्या कोणत्या तत्त्वात बसते!झाडांच्या पालापाचोळा टाकाऊ भाजीपाला अशा विविध कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार होते असे शिकविले जात परंतु यावर विद्यार्थी कसे विश्वास ठेवणार आणि त्यांना सेंद्रिय खते कसे तयार करता येणार?शेवटी आमच्या पिढ्या वर्षानुवर्ष खताबियांसाठी परावलंबिच बनत चालल्या आहेत. "आचार्य विनोबाजी नेहमी म्हणायचे खरे ध्येय विद्यार्थ्यांसाठी स्वावलंबी शिक्षण आहे." 1951 च्या दरम्यान स्वावलंबी शिक्षणाने विराट रूप धारण केले जे सरकारच्या विना सहकार्याने प्रक्षेपित झाले स्वालंबी शिक्षण म्हणजे नई तालीम 1958 च्या काँग्रेसच्या 63 व्या अधिवेशना मध्ये काँग्रेसने एकमताने ठराव पास केला की देशातील प्रत्येक शाळा ही लवकरात लवकर बुनियादी शाळा बनली पाहिजे ! परंतु सदर प्रस्तावावर कुणी अंमलबजावणी करायला तयार नव्हते अशाप्रकारे स्वातंत्र्यानंतर या स्वावलंबी शिक्षणाचा घात आमच्या भारतीयांनीच केला.
* शैक्षणिक सुधारण्यासाठी सरकारची भूमिका शून्य *
सर्वात जास्त सुधारणा ह्या शिक्षण वेवस्थेत कराव्या लागत असतात पण जे कोणी सरकार भारत देशाच्या सत्तेवर येतं ते स्वतःचे बंगले बांधण्यातच दंग होते त्यामुळे अत्यावश्यक कामकाजामध्ये सरकार शून्य कर्तव्य बजावते, असाच प्रकार देश स्वतंत्र झाल्यापासून चालू आहे, देशात स्वावलंबी शिक्षण पद्धतीला मान्यता दिल्यानंतर ही भारतात दोन शिक्षण प्रणाली सोबतच सुरू झाल्या अगदी समांतर एक शिक्षण प्रणाली सर्वसाधारण भारतीय जनतेसाठी आणि दुसरी शिक्षण प्रणाली धनवान मध्यमवर्गासाठी लोकांसाठी 1961 पर्यंत एकूण 14 बुनियादी शिक्षण संमेलन घेण्यात आले म्हणजेच स्वावलंबी शिक्षण संमेलन परंतु यामध्ये सरकारने आपली भूमिका सदैव शून्य बजावली 1972 मध्ये सेवाग्राम ला नई तालीमच्या शिक्षा मंडळ ने रजत जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय शिक्षण संमेलन आयोजित केले होते त्याचे अध्यक्ष श्रीमन्नारायनजी जी आणि उद्घाटक स्वतः इंदिरा गांधी होत्या. स्वतः इंदिरा गांधी यांनी आपल्या भाषणांमध्ये उद्गारले की "हमने देश की शिक्षा मे कोई बदल न करके भारी भूल की है!" आचार्य विनोबाजीने सुद्धा आपले मत स्पष्ट केले की , शिक्षा सरकारी तंत्र से मुक्त होना चाहिये | शिक्षा पर सरकार का कोई वरदहस्त नही होना चाहिये |
एक तरफ डेमोक्रेसी का दावा करना और दुसरी तरफ विद्यार्थीयों का दिमाग कागद की ढाचे मे ढालना, यह डेमोक्रेसी के मूलभूत विचारोके खिलाफ है 27 नोव्हेंबर 1975 ला केंद्रीय सलाहकार मंडळाच्या समक्ष तत्कालीन प्रधानमंत्री म्हणाले होते की, ' पश्चिमी शिक्षा पद्धती के प्रति अनुराग कोई अच्छी बात नही है, इससे देश का नुकसान हो रहा है | यह दुर्भाग्य की बात है कि छात्रों को अपने देश की समस्या के बारे मे अवगत नही कराया जाता |'
अशाप्रकारे वरील सर्व विचार लक्षात घेतल्यानंतर कळते की , परावलंबी शिक्षण हे किती धोक्याच आहे परंतु अनेकांना प्रश्न पडतो की परावलंबी म्हणजे नेमकं काय ? उदाहरणार्थ एक विद्यार्थी आपल्या शिक्षकावर पूर्णपणे अवलंबून असतो , म्हणजेच तो स्वतःच्या शिक्षणासाठी स्वतः प्रयत्न करत नाही , फक्त शिक्षकावरच अवलंबून असतो . अशा प्रकारच्या शिक्षणाला परावलंबी शिक्षणll म्हणतात .
* परावलंबी शिक्षणाची कारणे *
- पाठ्यपुस्तकावर भर :- अनेकदा शिक्षक पाठ्यपुस्तकातील माहितीलाच प्राधान्य देतात आणि विद्यार्थ्यांना स्वतः शोधण्याची संधी देत नाहीत .
- परीक्षावर अधिक भर :- परीक्षा मध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थी फक्त पाठ्यपुस्तकातली माहितीच गोखत बसतात आणि परीक्षा पुरताच त्या माहितीचा उपयोग करून घेतात , परीक्षा नंतर सर्व शिकलेले ज्ञान विसरून जातात .
- शिक्षकांची शैली :- काही शिक्षकांची शैली अशी असते की विद्यार्थी स्वतः विचार करण्याऐवजी शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टीचे अनुकरण करतात
- शिक्षण प्रणाली : सध्या शिक्षण प्रणालीच अशी बनत चालली आहे की त्यामध्ये विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार करण्याची संधीच मिळत नाही
* परावलंबी शिक्षणाचे परिणाम *
- स्वतंत्र विचार करण्याची क्षमता कमी होणे विद्यार्थी स्वतः प्रश्न विचारणे नवीन कल्पना निर्माण करणे आणि समस्या सोडवणे या गोष्टी करण्यास असमर्थ होतात .
- रट्टा / टोला मारण्याची सवय :- विद्यार्थी फक्त माहिती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत
- ज्ञान स्थिर होणे :- विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान शिकवण्यात आणि त्याचा वापर करण्यात अडचण येते .
- अभिनव विचारांचा अभाव :- विद्यार्थ्यांमध्ये नवीन विचार करण्याची क्षमता कमी होते .
* परावलंबी शिक्षण टाळण्यासाठी उपाययोजना *
- शिक्षकांची भूमिका :- शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य विचार करण्यासाठी प्रोत्साहित करावे .
- पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाणे :- शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध स्रोतांमधून माहिती शोधण्याची संधी द्यावी .
- प्रकल्प आधारित शिक्षण :- विद्यार्थ्यांना विविध प्रोजेक्ट देऊन त्यांना स्वतः शोधण्याची आणि समस्या सोडवण्याची संधी द्यावी
- चर्चा - वादविवाद :- विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्रे आणि वादविवाद सत्रे आयोजित करणे .
- शिक्षण प्रणालीत बदल :- शिक्षण प्रणालीत बदल करून विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार करण्याची संधी द्यावी .
निष्कर्ष :-
एकंदरीत परावलंबी शिक्षण ही एक गंभीर समस्या आहे त्याची परिणाम विद्यार्थ्यांच्या संपूर्ण जीवनावर होतात . म्हणून या समस्येवर उपाय शोधणे खूप महत्त्वाचे आहे . शिक्षक पालक आणि समाज या सर्वांनी मिळून या दिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे
![]() |
परावलंबी शिक्षणलेखक सौ . गायत्री अमोल बिरादारहा लेख अनेक वाचकापर्यंत शेअर करा आणि आपले अमूल्य मत खालील कमेंट मध्ये नोंदवा किंवा टिपणी प्रविष्ट करा . |

सुंदर 👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद🙏
हटवाखरंच विचार करायला लावणारा लेख आहे
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडम 🙏
हटवाखूप छान विचार
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
उत्तर द्याहटवालेख सुंदर आहे, ह्यात शिक्षणाच्या पद्धतीचा सर्व बाजूने विचार झाला आहे, उपाय योजनेसाठी आणखी मार्ग आणि प्रयत्नांची गरज आहे, ते काही प्रमाणात सुरु पन झाले आहेत, उपाययोजना दुरगामी असल्यामुळे परिणाम साधायला थोडा वेळ लागेल पन सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर नक्की होईल 👍
उत्तर द्याहटवाआपण आपले अमूल्य मत नोंदवल्याबद्दल धन्यवाद नक्कीच शैक्षणिक सुधारणा होणे ही काळाची नितांत गरज आहे , जितका शरीरात प्राण आवश्यक आहे तितकाच शिक्षण व्यवस्थित सुधारणा होणे ही आवश्यक आहे असं मला वाटतं 🙏
हटवासुरेख मांडणी
उत्तर द्याहटवाआपले अमूल्य मत नोंदवल्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन लेख वाचण्यासाठी आम्हाला फॉलो करा 🙏
हटवा