कोयता गॅंग एक भीषण समस्या
कोयता गँग ही एक समाजात भयावह समस्या बनत चालली आहे. त्यामुळे समाजात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होत चालले आहे. राजधानी पासून ते खेड्यापाड्यापर्यंत कोयता गॅंगने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. अनेक गरीब आणि चांगल्या कुटुंबातील मुले सुद्धा कोयता गँगकडे आकर्षले जात आहेत. ही गोष्ट त्या मुलांच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी चिंतेचा विषय बनत आहे.
* विश्वाला अहिंसेची शिकवण देणारा भारत देश *
एकेकाळी संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे गौतम बुद्ध भारत देशात जन्मले. भगवान गौतम बुद्धाने विश्वाला शांततेचा संदेश देऊन जगाच्या पाठीवर भारत देशाची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज लोकं धर्माधर्मात भांडून हिंसेला खतपाणी घालत आहेत भगवान गौतम बुद्धांनी धर्माबरोबरच शांती शिकवली आहे, शांती हाच धर्म आहे. म्हणून जगाने हृदयापासून भगवान बुद्धाला स्वीकारलं आहे. आजही विश्वभरातून एकच नाद घुमतो की " युद्ध नको बुद्ध हवा " असे शांततेचे संदेश आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये आज कुठेही दिसत नाहीत पावलोपावली दिसते ती फक्त स्पर्धा आणि स्पर्धा विद्यार्थ्यांना एकमेकांशी स्पर्धा करायला भाग पाडल्या जाते. या अशा स्पर्धेमुळे विषमता वाढते आणि विषमतेतून हिंसा जन्माला येते आणि अलीकडे हिंसेने रुद्र रूप धारण केले आहे. पावलोपावली हिंसेने भरलेले चेहरे निदर्शनास येत आहेत हिंसाचाराच्या बातम्या आणि घटना लिहिण्यासाठी वर्तमानपत्रातील जागा सुद्धा कमी पडत आहे 24 तास सर्वत्र हिंसाच हिंसा वाढली आहे. त्या हिंसेतूनच उदयाला आलेली समस्या म्हणजेच कोयता गँग.
* कोयता गॅंग निर्माण होण्याची कारणे *
- गरीबी :- आपल्या देशात गरीबी ही जटील समस्या बनली आहे. गरिबीमुळे अनेक कुटुंब उघड्यावर आहेत गरीब कुटुंबातील लेकरा बाळांना आज अन्नपाण्याची सुद्धा सोय नसते. अनेक वेळा त्यांच्यावर उपासमारीची ही वेळ आलेली असते. अत्यावश्यक गरजाही जेव्हा पूर्ण होत नाहीत अन्न वस्त्र निवारा ही जेव्हा मिळत नाही तेव्हा गरिबीला कंटाळून काही मुले आशा कोयतागॅंकडे आकर्षित होताना दिसत आहेत
- बेरोजगारी :- आज घडीला 85% युवक वर्ग हा बेरोजगार आहे. जे वय जास्तीत जास्त मेहनत करण्याचे असते ज्यांच्या मनगटामध्ये पहाडालाही पाझर फोडण्याची ताकद असते लाथ मारल तिथे पाणी निर्माण करण्याची क्षमता असते. अशा ताकतवान युवा वर्गाला बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. हाताला काम नसल्यामुळे युवा वर्ग कोयता गँग कडे वळला जात आहे.
- शिक्षणाचा अभाव :- काही मुलांना योग्य वयात योग्य ते शिक्षण मिळत नाही. शिक्षणाच्या अभावामुळे मुलं कोयता गँगकडे वळतात.
- कौटुंबिक समस्या :- काही मुलांना कौटुंबिक समस्याचा सामना करावा लागतो जसे की त्यांच्या आई आणि वडिलांनमध्ये भांडन असेल.आई वडील एकत्र राहत नसतील तर आई वडिलांपासून मुलांची ताटातूट होते मुलांना आई-वडिलांचे प्रेम मिळत नाही, कुठल्याही प्रकारचे कौटुंबिक सुख त्या मुलांना मिळत नाही अशी मुले व्यसनाच्या आहारी जाऊन शेवटी कोयतागँग कडे वळतात.
- सामाजिक अन्याय :- मुलांच्या एखाद्या चुकीच्या कृत्यामुळे त्यांना समाजातून मोठ्या प्रमाणात शिक्षा मिळते त्यांची चूक लक्षात घेता झालेली शिक्षा ही समाजाने केलेला अन्याय असतो. असा अन्याय मुलांना जेव्हा असाही होतो तेव्हा मुले कोयता गँगकडे वळतात
- समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते.
- गावात आणि शहरात अशांतता निर्माण होते.
- कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.
- विद्यार्थी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते.
- स्वतः कोयता चालवतात त्यांच्यावरही याचा परिणाम होतो. व त्यांचे आयुष्य उध्वस्त होते.
- कोयतेधारकांच्या पालकांनाही याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात.
- बऱ्याच वेळा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होते.
- अनेक वेळा जीवित हानी होते.
- स्थानिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.
- वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते.
- सर्वात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक नुकसान होते.
- * कोयता गॅंगवर नियंत्रण व उपाययोजना*
- रोजगार निर्मिती करणे ( हर हाताला काम हर कामाला हात ) कोयता गॅंगकडे मुलं वळू द्यायचे नसतील तर रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे अत्यंत महत्त्वाच आहे.
- कौशल्य विकास कार्यक्रम :- समाजात प्रत्येक मुलाच्या अंगी कोणते ना कोणते कला कौशल्य असते अशा कलागुणांना वाव देण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे महत्त्वाचे ठरते.
- नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे :- भरगच्च पगार देऊन मोजक्या जागा भरण्यापेक्षा मोजका पगार देऊन भरघोस जागा भरणे महत्वाचे ठरते. सरकारने नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध केल्यास मुलं अशा हिंसक ग्यांकडे वळणार नाहीत.
- सामाजिक प्रबोधन कार्यक्रम राबवणे :- वेगवेगळे विचारवंत बोलून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात मुलांचे वैचारिक प्रबोधन करणे
- अहिंसा व शांततेचे धडे देणे :- भगवान गौतम बुद्ध, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, फुले, शाहू,आंबेडकर, एपीजे अब्दुल कलाम अशा अनेक देशभक्तांच्या विचारांची शिकवण देणे.
- पोलिसांनी समाजातील सहकार्य वाढवणे :- पोलीस आणि समाज यांच्यातील जवळीकता वाढली पाहिजे पोलिसांनी केवळ पोलीस स्टेशनच न सांभाळता अनेक अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात आलं पाहिजे. समाजासाठी वेळोवेळी जागृत राहिलं पाहिजे.
- कोयता गॅंग मधील मुलांच्या पालकांचे प्रबोधन :- जे मुले कोयता गॅंग मध्ये सामील आहेत त्यांच्या कुटुंबांना भेटी दिल्या पाहिजे त्यांच्या पालकांना त्यांच्या मुलांच्या आयुष्यावर होणारे परिणाम समजावून सांगितले पाहिजे. जेणेकरून ते आपल्या मुलांना कुटुंबात परत आणतील इतर मुलाप्रमाणे चांगले शिक्षण देऊन समाजामध्ये ताठ मानेने फिरतील अशाप्रकारे त्यांच्या पालकांचे प्रबोधन केले पाहिजे
- कठोर कारवाई :- कोयता गॅंग जेव्हा परिस्थिती हाताबाहेर घालतात कोयता गँगच्या संख्या झपाट्याने वाढायला लागतात तेव्हा पोलिसांनी कठोर पावले उचलून अशा कोयता गॅंग विरुद्ध कठोरातील कठोर कारवाई केली पाहिजे. जेणेकरून कोयता गॅंग बरखास्त झाल्या पाहिजेत.
- कोयता गॅंग मधील मुलांचे पुनर्वसन :- ज्या मुलांना कोयता गॅंग मधून बाहेर पडायचे आहे त्या मुलांना समाजाने सामावून घ्यावे. त्यांच्यासाठी चांगले शिक्षण आणि त्यांच्या हाताला काम मिळवून द्यावे.
- कोयत्या गॅंग मधील मुलांना कुठल्याही प्रकारचे राजकीय वरद हस्त मिळू नयत. जर कुठे कोयता गँगला राजकीय पाठबळ मिळत असल्यास लोकांनी अशा राजकीय पुढार्यावर वेळोवेळी दबाव आणावा.
- वरील सर्व परिणाम टाळण्यासाठी कोयता गॅंगवर ठोस उपाययोजना होणे महत्त्वाचे आहे.
अशाप्रकारे सर्व स्तरातील समाजातील लोकांनी एकत्र येऊन कोयता गँग मुलांचं आयुष्य उध्वस्त होण्यापासून रोखण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्न करावेत आणि एकमेकांना सहकार्य करावे.
आपला भारत देश हा शांततेच्या मार्गाने वाटचाल करत आला आहे आणि पुढेही आपल्याला याच शांततेच्या मार्गाने जायचं आहे
" शांती परम-सुख "
 |
भगवान बुद्ध |
लेखक सौ . गायत्री अमोल बिरादार
हा लेख अनेक वाचकापर्यंत शेअर करा आणि आपले अमूल्य मत खालील कमेंट मध्ये नोंदवा किंवा टिपणी प्रविष्ट करा .
अतिशय महत्वपूर्ण लेख 👌👍🇮🇳👌👍
उत्तर द्याहटवाचालु घडामोडी वरील सर्व प्रश्न आणि त्याचे उत्तर
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवा