भारतीय शिक्षणाचा पूर्व इतिहास.
पूर्वी भारत विश्वाच्या पाठीवर एक वैभवशाली राष्ट्र म्हणून ओळखल्या जायचे. कारण भारत या देशात प्रत्येक माणसाच्या हाताला काम होते. प्रत्येकाच्या मुखामध्ये त्यांच्या त्यांच्या धर्मदेवतांचे नाव होते आणि प्रत्येक गावात स्वावलंबी शिक्षण देणारे कला गुण शिकवणारे वेगवेगळ्या विद्या,वेगवेगळे शास्त्र कृषी, पाणी,माती,वारा,अग्नी, वृक्ष, अवकाश. या सर्वांचे ज्ञान देणारे उत्कृष्ट व्यवस्थापन करणारे शिक्षण, आरोग्य शिक्षण, चरित्र घडवणारे शिक्षण. अशा सर्व समावेश कलांचा समावेश असणारे शिक्षा गुरुकुल प्रत्येक गावामध्ये नियमित चालत असायचे त्यामुळे त्या ज्ञानाच्या जोरावर आपल्या भारत देशातील गावे ही स्वावलंबी आणि स्व ताक्तीने उभे होते. यामुळेच आपला भारत देश या असंख्य गावाच्या ताकतीवर ताठ मानेने उभा होता. भारत देशाची ताकद मुठभर शहरापेक्षा असंख्य खेड्यामध्ये पसरलेली होती. याचे मुख्य कारण म्हणजे स्वावलंबी गुरुकुल शिक्षण पद्धती.
![]() |
| तरुणांच्या हाताला काम |
जेव्हा इंग्रज व्यापारी म्हणून भारतात वावरू लागले. व्यापारी म्हणूनच गावागावात व्यापार करू लागले.तेव्हा त्यांची नजर सशक्त अशा भारतातील खेड्यांवर पडली.भारत देशातील सशक्त गावे पाहून ब्रिटिशांनी संशोधन करायला सुरुवात केले की भारत देशातील गावे इतके समृद्ध शाली व स्वावलंबी कशामुळे आहेत. त्यांच्यातीलच एक इंग्रज ज्यांचे नाव होते लॉर्ड मेकाले या ब्रिटिशांनी शोधून काढले की फक्त आणि फक्त भारतीय शिक्षण पद्धतीमुळे या देशातील गावे समृद्ध, स्वावलंबी आणि उन्नत आहेत. मुळात इंग्रजांची वृत्ती ही साम्राज्यवादी होती. इतका वैभवशाली भारत देश हा ब्रिटिशांचाच व्हावा असा लोभ ब्रिटिशांना झाला आणि त्या लालसे पोटी ब्रिटिशांनी भारतीय संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती नष्ट करायची असेल, भारतातील उन्नत गाव तोडायची असतील, या भारत देशावर इंग्रजी साम्राज्य स्थापन करायचे जर असेल तर सर्वप्रथम भारतीय शिक्षण पद्धती बदलली पाहिजे. ब्रिटिशांचा दृढ निश्चय होता की भारतीयांना भारतीय पद्धतीचे शिक्षण दिल्यास किंवा त्यांना पूर्णपणे अशिक्षितच ठेवल्यास भारतीय लोक इंग्रजांना जास्त दिवस ब्रिटिशांना भारतात टिकून देणार नाहीत त्यामुळे ब्रिटिशांनी भारतातील शिक्षण पद्धती बदलण्याचा निर्णय घेतला. ब्रिटिशांच्या या निर्णयामुळे 1833 मध्ये लॉर्ड हार्डिंगने आदेश पत्र काढले होते की सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यात ज्यांना इंग्रजी लिहिता वाचता येते त्यांनाच प्राधान्य देण्यात येईल त्याचा परिणाम असा झाला की विज्ञानापेक्षा भारतीय लोक इंग्रजी भाषेला जास्त महत्त्व देऊ लागले भारतीय समाजातील उच्चवर्गीयांना इंग्रजी शिक्षण प्रणालीत प्रथम प्राधान्य व सुविधा देण्यात आल्या त्याच्या पाठीमागे इंग्रजांचा हेतू असा होता की हे उच्चवर्णीय लोक इंग्रजी शिक्षण घेऊन इंग्रजी प्रणालीत परिपक्व होतील आणि शिक्षित झाल्यानंतर हेच शिक्षण सर्वसामान्य भारतीयांना देतील अशा प्रकारे भारतीय कडूनच भारतीया पर्यंत इंग्रजी शिक्षण पद्धती पसरविण्यात आली. जो प्रस्ताव लॉर्ड मेकाले यांनी ठेवलेला होता तेव्हाचे जनरल गव्हर्नर विलियम बैन्टिक यांनी आज्ञापत्र काढून लागू केला. 1833 च्या आज्ञा पत्रानुसार भारतात 2 फेब्रुवारी 1835 ला लॉर्ड मेकॅलच्या इंग्रजी शिक्षण प्रणालीला मान्यता देण्यात आली.
![]() |
| ब्रिटिश संस्कृती |
लेखक- गायत्री अमोल बिरादार


छान
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवासुंदर 👌
उत्तर द्याहटवाBadal zala phaje
उत्तर द्याहटवानकीच 👍
उत्तर द्याहटवाशैक्षणिक वयात कोणत्याच विद्यार्थ्यांचा वैयक्तिक पणे विचार येथील शिक्षण पद्धत करत नाही..
उत्तर द्याहटवाअगदी बरोबर नेमका हाच बदल घडावा म्हणून आपण प्रयत्न करत आहोत... धन्यवाद धन्यवाद
हटवाखरंच खूप सुंदर लेख प्रकाशित केलात ताई तुम्ही शिक्षणात बदल होणे खरंच खूप गरजेचे आहे.
उत्तर द्याहटवा