मुख्य सामग्रीवर वगळा

जीवन शिक्षण

भारतीय शिक्षणाचा पूर्व इतिहास.

 पूर्वी भारत विश्वाच्या पाठीवर एक वैभवशाली राष्ट्र म्हणून ओळखल्या जायचे. कारण भारत या देशात प्रत्येक माणसाच्या हाताला काम होते. प्रत्येकाच्या मुखामध्ये त्यांच्या त्यांच्या धर्मदेवतांचे नाव होते आणि प्रत्येक गावात स्वावलंबी शिक्षण देणारे कला गुण शिकवणारे वेगवेगळ्या विद्या,वेगवेगळे शास्त्र कृषी, पाणी,माती,वारा,अग्नी, वृक्ष, अवकाश. या सर्वांचे ज्ञान देणारे उत्कृष्ट व्यवस्थापन करणारे शिक्षण, आरोग्य शिक्षण, चरित्र घडवणारे शिक्षण. अशा सर्व समावेश कलांचा समावेश असणारे शिक्षा गुरुकुल प्रत्येक गावामध्ये नियमित चालत असायचे त्यामुळे त्या ज्ञानाच्या जोरावर आपल्या भारत देशातील गावे ही स्वावलंबी आणि स्व ताक्तीने उभे होते. यामुळेच आपला भारत देश या असंख्य गावाच्या ताकतीवर ताठ मानेने उभा  होता. भारत देशाची ताकद मुठभर शहरापेक्षा असंख्य खेड्यामध्ये पसरलेली होती. याचे मुख्य कारण म्हणजे स्वावलंबी गुरुकुल शिक्षण पद्धती.

 
 तरुणांच्या हाताला काम 
भारतीय शिक्षण बदलत कसे गेले...

जेव्हा इंग्रज व्यापारी म्हणून भारतात वावरू लागले. व्यापारी म्हणूनच गावागावात व्यापार करू लागले.तेव्हा त्यांची नजर सशक्त अशा भारतातील खेड्यांवर पडली.भारत देशातील सशक्त गावे पाहून ब्रिटिशांनी संशोधन करायला सुरुवात केले की भारत देशातील गावे इतके समृद्ध शाली व स्वावलंबी कशामुळे आहेत. त्यांच्यातीलच एक इंग्रज ज्यांचे नाव होते लॉर्ड मेकाले या ब्रिटिशांनी शोधून काढले की फक्त आणि फक्त भारतीय शिक्षण पद्धतीमुळे या देशातील गावे समृद्ध, स्वावलंबी आणि उन्नत आहेत. मुळात इंग्रजांची वृत्ती ही साम्राज्यवादी होती. इतका वैभवशाली भारत देश हा ब्रिटिशांचाच व्हावा असा लोभ ब्रिटिशांना झाला आणि त्या लालसे पोटी ब्रिटिशांनी भारतीय संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती नष्ट करायची असेल, भारतातील उन्नत गाव तोडायची असतील, या भारत देशावर इंग्रजी साम्राज्य स्थापन करायचे जर असेल  तर सर्वप्रथम भारतीय शिक्षण पद्धती बदलली पाहिजे. ब्रिटिशांचा दृढ निश्चय होता की भारतीयांना भारतीय पद्धतीचे शिक्षण दिल्यास किंवा त्यांना पूर्णपणे अशिक्षितच ठेवल्यास भारतीय लोक इंग्रजांना जास्त दिवस ब्रिटिशांना भारतात टिकून देणार नाहीत त्यामुळे ब्रिटिशांनी भारतातील शिक्षण पद्धती बदलण्याचा निर्णय घेतला. ब्रिटिशांच्या या निर्णयामुळे 1833 मध्ये लॉर्ड हार्डिंगने आदेश पत्र काढले होते की सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यात ज्यांना इंग्रजी लिहिता वाचता येते त्यांनाच प्राधान्य देण्यात येईल त्याचा परिणाम असा झाला की  विज्ञानापेक्षा भारतीय लोक इंग्रजी भाषेला जास्त महत्त्व देऊ लागले भारतीय समाजातील उच्चवर्गीयांना इंग्रजी शिक्षण प्रणालीत प्रथम प्राधान्य व सुविधा देण्यात आल्या त्याच्या पाठीमागे इंग्रजांचा हेतू असा होता की हे उच्चवर्णीय लोक इंग्रजी शिक्षण घेऊन इंग्रजी प्रणालीत परिपक्व होतील आणि शिक्षित झाल्यानंतर हेच शिक्षण सर्वसामान्य भारतीयांना देतील अशा प्रकारे भारतीय कडूनच भारतीया पर्यंत इंग्रजी शिक्षण पद्धती पसरविण्यात आली. जो प्रस्ताव लॉर्ड मेकाले यांनी ठेवलेला होता तेव्हाचे जनरल गव्हर्नर विलियम बैन्टिक यांनी आज्ञापत्र काढून लागू केला. 1833 च्या आज्ञा पत्रानुसार भारतात 2 फेब्रुवारी 1835 ला लॉर्ड मेकॅलच्या इंग्रजी शिक्षण प्रणालीला मान्यता देण्यात आली.



 ब्रिटिश संस्कृती
                                          
                                  लेखक- गायत्री अमोल बिरादार  



टिप्पण्या

  1. शैक्षणिक वयात कोणत्याच विद्यार्थ्यांचा वैयक्तिक पणे विचार येथील शिक्षण पद्धत करत नाही..

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अगदी बरोबर नेमका हाच बदल घडावा म्हणून आपण प्रयत्न करत आहोत... धन्यवाद धन्यवाद

      हटवा
  2. खरंच खूप सुंदर लेख प्रकाशित केलात ताई तुम्ही शिक्षणात बदल होणे खरंच खूप गरजेचे आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुन्हेगारीला प्रवर्त करणारी शिक्षण पद्धती!

कोयता गॅंग एक भीषण समस्या  कोयता गँग ही एक समाजात भयावह समस्या बनत चालली आहे. त्यामुळे समाजात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होत चालले आहे. राजधानी पासून ते  खेड्यापाड्यापर्यंत कोयता गॅंगने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. अनेक गरीब आणि चांगल्या कुटुंबातील मुले सुद्धा कोयता गँगकडे आकर्षले जात आहेत. ही गोष्ट त्या मुलांच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी चिंतेचा विषय बनत आहे. * विश्वाला अहिंसेची शिकवण देणारा भारत देश *  एकेकाळी संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे गौतम बुद्ध भारत देशात जन्मले. भगवान गौतम बुद्धाने विश्वाला शांततेचा संदेश देऊन जगाच्या पाठीवर भारत देशाची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज लोकं धर्माधर्मात भांडून हिंसेला खतपाणी घालत आहेत भगवान गौतम बुद्धांनी धर्माबरोबरच शांती शिकवली आहे, शांती हाच धर्म आहे.  म्हणून जगाने हृदयापासून भगवान बुद्धाला स्वीकारलं आहे. आजही विश्वभरातून एकच नाद घुमतो की " युद्ध नको बुद्ध हवा "    असे शांततेचे संदेश आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये आज कुठेही दिसत नाहीत पावलोपावली दिसते ती फक्त स्पर्धा आणि स्पर्धा विद्यार्थ्यांना एकमेकांशी...

मकोका म्हणजे काय?

महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राइम ऍक्ट    मकोका म्हणजे काय ?  मकोका कधी लागतो ?   मकोका कारवाई कुणावर होते .  मकोका कारवाई झाल्यानंतर आरोपीला कोणती शिक्षा होते..   कायदा   https://youtube.com/@avirat.biradar2021?si=UHBCkTgiRKJAmA1m * मकोका म्हणजे काय :-  महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ऍक्ट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा म्हणजेच मकोका होय.  राज्य सरकारने संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी मकोका कायदा हा करण्यात आला.  मकोका कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालतो.   * मकोका कधी लागतो :-  गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते . पण या संधीचा गैरफायदा घेऊन तो आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवर येतो . आरोपीवर अटकेची व तडीपारची देखील कारवाई होते . अशा आरोपींना अटक केली जाते तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास आरोपीवर तडीपाराची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपी मध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलिसांना मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आह...

लबाड आणि लुटारू शिक्षण व्यवस्था

सध्या शिक्षण व्यवस्थेमध्ये लबाड , खोटे - नाटे बोलून विद्यार्थी आणि पालक वर्गाला लुटत राहणे हा व्यापारच झाला आहे का ?  शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, पण हे दूध मात्र ज्यांच्याकडे धनाचा साठा भरमसाठ आहे , आणि जो छुप्या मार्गाने शिक्षण यंत्रणेला  देऊ शकतो त्यालाच हे वाघिणीचे दूध दिले जात आहे का ? असा भयानक प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे .  आज समाजामध्ये मुठभर बुद्धिजीवी लोक शिकून सवरून मोठे होत आहेत . परंतु त्यांच्यासाठी आणखीन एक परीक्षा लावली जात आहे . ती परीक्षा म्हणजे धनसंपत्ती परीक्षा !  ज्यांच्याजवळ जेवढा जास्त पैसा त्याची तेवढी जास्त गुणवत्ता ! गुणवत्तेच्या यादीत पहिल्या क्रमांकावर त्याचेच नाव  छुप्या मार्गाने जो पैशाच्या गरम नोटा शिक्षण यंत्रणेला नेवून देईल .  वैद्यकीय , अभियांत्रिकी  महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी  वीस पंचवीस लाखापासून करोडो रुपये मोजावे लागतात . जर विचार केला तर खरंच एका विद्यार्थ्यामागे करोडो रुपये खर्च शिक्षण व्यवस्था करते का ? शिक्षण व्यवस्थेने यावर कधी आत्मपरीक्षण केलं आहे का ? अशी लाखो करोडो रुपये भरण्याइतपत सर्वसाधार...