महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राइम ऍक्ट
- मकोका म्हणजे काय ?
- मकोका कधी लागतो ?
- मकोका कारवाई कुणावर होते .
- मकोका कारवाई झाल्यानंतर आरोपीला कोणती शिक्षा होते..
 |
कायदा |
* मकोका म्हणजे काय :-
महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ऍक्ट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा म्हणजेच मकोका होय.
राज्य सरकारने संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी मकोका कायदा हा करण्यात आला.
मकोका कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालतो.
* मकोका कधी लागतो :-
गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते . पण या संधीचा गैरफायदा घेऊन तो आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवर येतो . आरोपीवर अटकेची व तडीपारची देखील कारवाई होते . अशा आरोपींना अटक केली जाते तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास आरोपीवर तडीपाराची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपी मध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलिसांना मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आहे
* मकोका कारवाई कोणावर केली जाते :-
- हफ्ता वसुली.
- खंडणीसाठी अपहरण
- सुपारी देणे
- खून करणे
- अमली पदार्थाची तस्करी करणे यांच्यासारख्या संघटित गुन्हे करणाऱ्या टोळीवर मकोका लावला जातो .
मकोका लावण्यासाठी दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते . टोळीतील एकट्या गुन्हेगारांनी किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो.
तसेच अटक केलेल्या आरोपी पैकी एकावर का हो ना गेल्या दहा वर्षांमध्ये दोन गुन्ह्यांमध्ये आरोपपात्र झालेलं असणं बंधनकारक आहे तरच मकोका कारवाई केली जाते . पोलिसांना आरोप पात्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुद्दत वाढ दिली जाते .
मकोका कायद्यामुळे गुन्हेगाराला लवकर जामीन होत नाही त्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्ष तुरुंगात अडकून राहतात. त्यामुळे त्यांची सुटका होईपर्यंत गुन्हेगाराची संघटित टोळी मोडकळीस येते, विस्कळीत होते.
* मकोका लावण्याची प्रक्रिया :-
हत्या, खंडणी, दरोडा, खंडणीचा प्रयत्न,घुसखोरी इत्यादी गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा मागील दहा वर्षाचा इतिहास असणे कारवाईसाठी आवश्यक आहे . गुन्हेगारावरती दोन किंवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणे आवश्यक आहे . अशा गुन्हेगारावर मकोका अंतर्गत कारवाई केली जाते . त्याचबरोबर जे गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्या ज्यांचा हिंसाचार आर्थिक फायद्यासाठी असे गुन्हे करतात अशा गुन्हेगारावरती मकोका कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते.
* मकोकाची कारवाई झाल्यानंतर आरोपीला कोणती शिक्षा होते.
What is the punishment when a crime fild under
मकोका लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन सहजासहजी मिळवता येत नाही. भारतीय दंड संहितेच्या लावलेल्या कलमाखाली जेवढी शिक्षा असेल तीच शिक्षा मकोका कारवाई केलेल्या गुन्हेगाराला दिली जाते . ही शिक्षा किमान पाच वर्ष ते जन्मठेपेपर्यंत असते. त्याचबरोबर गुन्हेगाराची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. संघटित गुन्हेगारी करून जर आर्थिक फायदा घेतला जात असेल किंवा टोळी तयार करून गुन्हेगारी करत असाल तर त्यासंदर्भात मकोकाची तरतूद होते.
* मकोका कायदा केव्हा आला :-
14 फेब्रुवारी 1999 ला मकोका कायदा आला.
 |
Crimnial law |
लेखक गायत्री अमोल बिरादार
हा लेख अनेक वाचकापर्यंत शेअर करा आणि आपले अमूल्य मत खालील कमेंट मध्ये नोंदवा किंवा टिपणी प्रविष्ट करा .
ताई, थोडक्यात पण खूप छान आणि मोलाची माहिती. अशीच नवीन नवीन माहिती जाणून घ्यायला आवडेल 🫵
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
हटवाखुप छान माहिती
उत्तर द्याहटवा