मुख्य सामग्रीवर वगळा

मकोका म्हणजे काय?


महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राइम ऍक्ट 

  1.  मकोका म्हणजे काय ?
  2.  मकोका कधी लागतो ?
  3.  मकोका कारवाई कुणावर होते .
  4.  मकोका कारवाई झाल्यानंतर आरोपीला कोणती शिक्षा होते.. 

कायदा

कायदा 

https://youtube.com/@avirat.biradar2021?si=UHBCkTgiRKJAmA1m

* मकोका म्हणजे काय :-

 महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ऍक्ट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा म्हणजेच मकोका होय. 
राज्य सरकारने संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी मकोका कायदा हा करण्यात आला. 
मकोका कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालतो.
 

* मकोका कधी लागतो :- 

गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते . पण या संधीचा गैरफायदा घेऊन तो आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवर येतो . आरोपीवर अटकेची व तडीपारची देखील कारवाई होते . अशा आरोपींना अटक केली जाते तरीसुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास आरोपीवर तडीपाराची कारवाई केली जाते. यानंतरही आरोपी मध्ये जर सुधारणा होत नसेल तर, अशावेळी पोलिसांना मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आहे 

* मकोका कारवाई कोणावर केली जाते  :- 

  1.  हफ्ता वसुली.
  2. खंडणीसाठी अपहरण  
  3. सुपारी देणे  
  4.  खून करणे 
  5.  अमली पदार्थाची तस्करी करणे यांच्यासारख्या संघटित गुन्हे करणाऱ्या टोळीवर मकोका लावला जातो . 

मकोका लावण्यासाठी दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते . टोळीतील एकट्या गुन्हेगारांनी किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो. 
तसेच अटक केलेल्या आरोपी पैकी एकावर का हो ना गेल्या दहा वर्षांमध्ये दोन गुन्ह्यांमध्ये आरोपपात्र झालेलं असणं बंधनकारक आहे तरच मकोका कारवाई केली जाते . पोलिसांना आरोप पात्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुद्दत वाढ दिली जाते . 
 मकोका कायद्यामुळे गुन्हेगाराला लवकर जामीन होत नाही त्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्ष तुरुंगात अडकून राहतात. त्यामुळे त्यांची सुटका होईपर्यंत गुन्हेगाराची संघटित टोळी मोडकळीस येते, विस्कळीत होते.

* मकोका लावण्याची प्रक्रिया  :- 

हत्या, खंडणी, दरोडा, खंडणीचा प्रयत्न,घुसखोरी इत्यादी गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा मागील दहा वर्षाचा इतिहास असणे कारवाईसाठी आवश्यक आहे . गुन्हेगारावरती दोन किंवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणे आवश्यक आहे . अशा गुन्हेगारावर मकोका अंतर्गत कारवाई केली जाते . त्याचबरोबर जे गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्या ज्यांचा हिंसाचार आर्थिक फायद्यासाठी असे गुन्हे करतात अशा गुन्हेगारावरती  मकोका कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते.

https://aviratvidya.blogspot.com


* मकोकाची कारवाई झाल्यानंतर आरोपीला कोणती शिक्षा होते.
What is the punishment when a crime fild under 


 मकोका लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन सहजासहजी मिळवता येत नाही. भारतीय दंड संहितेच्या लावलेल्या कलमाखाली जेवढी शिक्षा असेल तीच शिक्षा मकोका कारवाई केलेल्या गुन्हेगाराला दिली जाते . ही शिक्षा किमान पाच वर्ष ते जन्मठेपेपर्यंत असते. त्याचबरोबर  गुन्हेगाराची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. संघटित गुन्हेगारी करून जर आर्थिक फायदा घेतला जात असेल किंवा टोळी तयार करून गुन्हेगारी करत असाल तर त्यासंदर्भात मकोकाची तरतूद होते.

* मकोका कायदा केव्हा आला  :- 

14 फेब्रुवारी 1999 ला मकोका कायदा आला.

Crimnial

Crimnial law 



 लेखक गायत्री अमोल बिरादार 


https://aviratvidya.blogspot.com/2024/12/blog-post_9.html

हा लेख अनेक वाचकापर्यंत शेअर करा आणि आपले अमूल्य मत खालील कमेंट मध्ये नोंदवा किंवा टिपणी प्रविष्ट करा .


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुन्हेगारीला प्रवर्त करणारी शिक्षण पद्धती!

कोयता गॅंग एक भीषण समस्या  कोयता गँग ही एक समाजात भयावह समस्या बनत चालली आहे. त्यामुळे समाजात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होत चालले आहे. राजधानी पासून ते  खेड्यापाड्यापर्यंत कोयता गॅंगने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. अनेक गरीब आणि चांगल्या कुटुंबातील मुले सुद्धा कोयता गँगकडे आकर्षले जात आहेत. ही गोष्ट त्या मुलांच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी चिंतेचा विषय बनत आहे. * विश्वाला अहिंसेची शिकवण देणारा भारत देश *  एकेकाळी संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे गौतम बुद्ध भारत देशात जन्मले. भगवान गौतम बुद्धाने विश्वाला शांततेचा संदेश देऊन जगाच्या पाठीवर भारत देशाची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज लोकं धर्माधर्मात भांडून हिंसेला खतपाणी घालत आहेत भगवान गौतम बुद्धांनी धर्माबरोबरच शांती शिकवली आहे, शांती हाच धर्म आहे.  म्हणून जगाने हृदयापासून भगवान बुद्धाला स्वीकारलं आहे. आजही विश्वभरातून एकच नाद घुमतो की " युद्ध नको बुद्ध हवा "    असे शांततेचे संदेश आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये आज कुठेही दिसत नाहीत पावलोपावली दिसते ती फक्त स्पर्धा आणि स्पर्धा विद्यार्थ्यांना एकमेकांशी...

लबाड आणि लुटारू शिक्षण व्यवस्था

सध्या शिक्षण व्यवस्थेमध्ये लबाड , खोटे - नाटे बोलून विद्यार्थी आणि पालक वर्गाला लुटत राहणे हा व्यापारच झाला आहे का ?  शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, पण हे दूध मात्र ज्यांच्याकडे धनाचा साठा भरमसाठ आहे , आणि जो छुप्या मार्गाने शिक्षण यंत्रणेला  देऊ शकतो त्यालाच हे वाघिणीचे दूध दिले जात आहे का ? असा भयानक प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे .  आज समाजामध्ये मुठभर बुद्धिजीवी लोक शिकून सवरून मोठे होत आहेत . परंतु त्यांच्यासाठी आणखीन एक परीक्षा लावली जात आहे . ती परीक्षा म्हणजे धनसंपत्ती परीक्षा !  ज्यांच्याजवळ जेवढा जास्त पैसा त्याची तेवढी जास्त गुणवत्ता ! गुणवत्तेच्या यादीत पहिल्या क्रमांकावर त्याचेच नाव  छुप्या मार्गाने जो पैशाच्या गरम नोटा शिक्षण यंत्रणेला नेवून देईल .  वैद्यकीय , अभियांत्रिकी  महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी  वीस पंचवीस लाखापासून करोडो रुपये मोजावे लागतात . जर विचार केला तर खरंच एका विद्यार्थ्यामागे करोडो रुपये खर्च शिक्षण व्यवस्था करते का ? शिक्षण व्यवस्थेने यावर कधी आत्मपरीक्षण केलं आहे का ? अशी लाखो करोडो रुपये भरण्याइतपत सर्वसाधार...